paytm
paytm sakal
देश

Paytmवर चीनला डेटा शेअर केल्याचा आरोप; कंपनी म्हणते...

सकाळ डिजिटल टीम

पेटीएम कंपनी एकापाठोपाठ एक संकटात सापडत आहे. आता डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम पेमेंट बँकेचा डेटा चिनी कंपन्यांसोबत शेअर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ब्लूमबर्गच्या सूत्रांनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) वार्षिक तपासणीत असे आढळून आले की, कंपनीचे सर्व्हर अप्रत्यक्षपणे पेटीएम पेमेंट्स बँकेत भागभांडवल असलेल्या चीन-आधारित फर्मसह आवश्यक माहिती सामायिक करीत आहेत. मात्र, पेटीएमने या प्रकरणी निवेदन जारी करून नकार दिला आहे. (Paytm accused of sharing data with China)

११ मार्च रोजी आरबीआयने पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँकेवर कारवाई करीत कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्याची चर्चा केली होती. सोबतच बँकेला त्यांच्या आयटी प्रणालीचे सर्वसमावेशक ऑडिट करण्यास सांगितले होते. ही बातमी समोर आल्यानंतर ब्लूमबर्गने सोमवारी एका स्रोताचा हवाला देऊन सांगितले की, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला ११ मार्च रोजी नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केली होती. कारण, त्यांनी भारताच्या नियमांचे उल्लंघन करून परदेशातील सर्व्हरवर डेटा हस्तांतरित (Transfer data to server) केला होता.

पेटीएम पेमेंट्स बँकेने निवेदन जारी करून या वृत्ताचे खंडन केले आहे. चिनी कंपन्यांकडे डेटा लीक झाल्याचा दावा करणारा ब्लूमबर्गचा अलीकडील अहवाल खोटा आणि खळबळजनक आहे. पेटीएम पेमेंट्स बँक पूर्णपणे देशांतर्गत बँक असल्याचा अभिमान बाळगते आणि डेटा ट्रान्सफरबाबत आरबीआयच्या (RBI) सूचनांचे पूर्णपणे पालन करते. बँकेचा सर्व डेटा देशातच राहतो. आम्ही डिजिटल इंडिया उपक्रमाचे खरे विश्वासू आहोत आणि देशात आर्थिक समावेशकाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पेटीएम पेमेंट्स बँकेने म्हटले आहे.

कंपनीचे शेअर घसरले

नमूद आरोपानंतर कंपनीचे समभाग आज १३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. कंपनीचे शेअर्स NSE वर १२.२१ टक्क्यांनी घसरून ६८०.४० रुपयांवर बंद झाले. पेटीएमने (Paytm) आयपीओमध्ये इश्यूची किंमत २,१५० रुपये ठेवली होती. कंपनीच्या समभागांनी अद्याप ही पातळी गाठलेली नाही. पोटीएमचा सर्वकालीन उच्चांक १,९६१ रुपये आहे. पेटीएमचा स्टॉक त्याच्या इश्यू किमतीच्या जवळपास ६५ टक्के कमी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT