Rahul Gandhi Team eSakal
देश

पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता - राहुल गांधी

"संसदेत आम्ही यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करु. यावर चर्चा होऊ नये, अशीच भाजपाची इच्छा असेल"

दीनानाथ परब

नवी दिल्ली: पेगासस (Pegasus) पाळत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court) आज मोठा निर्णय घेतला. तीन सदस्यीय समिती स्थापन केली. "पेगाससच्या विषयात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. संसेदत आम्ही पुन्हा हा मुद्दा उपस्थित करु. संसदेत आम्ही यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करु. यावर चर्चा होऊ नये, अशीच भाजपाची (bjp) इच्छा असेल" असे काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) म्हणाले.

"पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता. आम्ही या विषयात लक्ष घालू हे सर्वोच्च न्यायालयाकडून उचलण्यात आलेले मोठे पाऊल आहे. यातून सत्य समोर येईल असा मला विश्वास आहे" असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

"शेवटच्या संसदीय अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने यावर आपलं मत मांडलं आणि आम्ही जे म्हणत होतो, त्याला पाठिंबा दिला. आमचे तीन प्रश्न होते. पेगाससला कोणी परवानगी दिली? कोणाविरोधात त्याचा वापर झाला आणि दुसऱ्या देशाकडे आपल्या लोकांची माहिती आहे का?" असे राहुल गांधी म्हणाले.

"पेगाससचा मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि भाजपाच्या मंत्र्यांविरोधात वापर झाला. पेगाससच्या वापरातून मिळणारा डाटा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे जात होता? निवडणूक आयोगाची फोन टॅपिंग, विरोधी पक्षनेत्यांचा डाटा पंतप्रधानां मिळत होता? जर हे असं घडत असेल, तर हा गुन्हा आहे" असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT