Pencil Peel Sakal
देश

Pencil Peel : पालकांनो सावधान! पेन्सिलीच्या शिसानं घेतला सहा वर्षीय चिमुरडीचा बळी

या घटनेनंतप पालकांनी सतर्क राहणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Six Years Child Died Due To Pencile Peel : पेन्सिलचं शिस घशात अडकून एका सहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पेन्सिलच शिस घशात अडकल्याने श्वास गुदमरून या मुलीचा मृत्यू झाला. विद्यार्थिनी तोंडात शार्पनर धरून पेन्सिल सोलत होती. त्यावेळी पेन्सिलचं शिस घशात अडकल्याने तिचा श्वास गुदमरला.

कोतवाली परिसरातील पहाडी वीर गावातील नंदकिशोर यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी त्यांचा मुलगा अभिषेक (१२) आणि मुली अंशिका (८) आणि अर्तिका (६) टेरेसवर अभ्यास करत होते. त्यावेळी अर्तिका तोंडात शार्पनर धरून पेन्सिल सोलत होती. त्यावेळी पेन्सिलचं शिस तिच्या घशात गेलं. यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी अर्तिकाला मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लहान मुलांना सामान्यतः कोणतीही गोष्ट उचलून तोंडात घालण्याची सवय असते, अशा परिस्थितीत पालकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले असून, पालकांनी सतर्क राहिल्यास अशा प्रकारच्या घटना टाळता येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT