people bang drums in an agricultural field kanpur video viral 
देश

Video: टोळधाडीवर शेतकऱयाने लढवली शक्कल...

वृत्तसंस्था

कानपूर (उत्तर प्रदेश) : देशात कोरोना व्हायरस, उष्णतेची लाट आणि टोळधाडीमुळे संकटे उभी आहेत. उत्तरेकडे टोळधाडीमुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे एका शेतकऱयाने शक्कल लढविली असून, व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात टोळ धाडीचे संकट आहे. नागपूर आणि वर्ध्यातील अनेक गावांमध्ये या किड्यांनी पिकांवर हल्ला केला आहे. त्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये टोळधाडीने थैमान घातले आहे. टोळधाड शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पण, कानपूरमधील शेतकऱ्यांनी नामी युक्ती लढवली आहे. ढोल, थाळी, भांडी घेऊन शेतात जोरजोरात वाजवले आहेत. ज्यामुळे टोळधाड येणार नाही आणि चुकून असेल तर पळून जाईल.

दरम्यान, टोळधाड वाटेत येणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान करत असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा आणि बीडमधील काही गावांमध्ये टोळधाड आली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. कानपूरमधील शेतकऱ्याने ढोल आणि थाळ्या वाजवून टोळधाडीला पळवून लावले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT