Mehbooba Mufti
Mehbooba Mufti esakal
देश

पाकिस्तानबाबत मेहबूबा मुफ्तींचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, भारतासारखी तिथं..

सकाळ डिजिटल टीम

मला आता पंतप्रधानांकडून कोणतीही आशा नाही, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (People's Democratic Party) नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पाकिस्तानबाबत (Pakistan) एक मोठं वक्तव्य केलंय. मेहबुबा मुफ्ती अनेकदा पाकिस्तानबद्दल सहानुभूतीपूर्ण वक्तव्ये करण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र, यावेळी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर संयमी विधान करताना त्यांनी पाकिस्तान हा आपला शेजारी देश असून तिथं लोकशाही बहरली पाहिजे, असं म्हंटलंय. शेजारील देशांमध्येही लोकशाही मजबूत व्हावी, अशी माझी इच्छा असल्याचंही त्या म्हणाल्या. श्रीनगरहून एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या मेहबुबा मुफ्ती यांना पाकिस्तानमधील राजकीय पेचप्रसंगाबद्दल विचारण्यात आलं असता, त्यांनी हे वक्तव्य केलंय.

इम्रान खान (Imran Khan) सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आता शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. आजच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता पाकिस्तान संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. संयुक्त विपक्षानं पाकिस्तानी मुस्लिम लीग-नवाज म्हणजेच पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची उमेदवार म्हणून घोषणा केलीय. दरम्यान, पीटीआयकडून शाह महमूद कुरेशी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ देखील आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Jammu and Kashmir Article 370) हटवल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सातत्यानं केंद्र सरकारवर नाराज आहेत. काल त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना सरकार जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. यासोबतच भाजप जम्मू-काश्मीरमधील लोकांना भडकवत असल्याचा आरोपही केलाय. मला आता पंतप्रधानांकडून कोणतीही आशा नाही, असंही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT