China 
देश

भारताविरोधात लढण्यासाठी चीनने बनवली 'मिमांग चेटोन' गँग

"डोंगराळ भागात तैनात होणारं सैन्य चांगलं प्रशिक्षित असलं पाहिजे, ही गोष्ट आता चीनच्या लक्षात आली असेल"

दीनानाथ परब

नवी दिल्ली: "नियंत्रण रेषेजवळील डोंगराळ भागात तैनात होणारं सैन्य चांगलं प्रशिक्षित असलं पाहिजे, ही गोष्ट आता चीनच्या (china) लक्षात आली असेल" भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी मंगळवारी हे विधान केलं. LAC जवळ मिलिशियामध्ये (militias) तिबेटीयन तरुणांची भरती करण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) प्रयत्न सुरु असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बीपिन रावत यांनी हे विधान केलं. (Peoples Liberation Army has stepped up efforts to recruit Tibetans in militias along the indian border)

"मागच्यावर्षी गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर भारताला लागून असलेल्या सीमेजवळ चीन आपल्या सैन्य तैनातीमध्ये बदल करत आहे. त्या घटनेनंतर आपल्याला अजून चांगलं प्रशिक्षित आणि तयार असलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आहे" असं बीपिन रावत म्हणाले.

सिक्कीमच्या जवळ असलेल्या चुंबी खोऱ्यात चीनने नवीन मिलिशिया बनवल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. या मिलिशियामध्ये स्थानिक तिबेटीयन तरुणांची भरती करण्यात आली आहे. या स्थानिक मिलिशियाला तिबेटीयन भाषेत 'मिमांग चेटोन' म्हटले जाते.

'मिमांग चेटोन'ला पीएलएकडून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या दोन बॅच असतील. एका बॅचमध्ये १०० मिलिशिया असतील. चुंबी खोऱ्यातील युतुंग, चीमा, पीबी थांग आणि पहारी या भागात 'मिमांग चेटोन'ला तैनात करण्यात आले आहे. या 'मिमांग चेटोन'मधील तरुणांना सध्या तरी कुठलाही गणवेश किंवा पद देण्यात आलेले नाही.

स्थानिक भूप्रदेशाची माहिती, भाषा, वातावरणाचा अभ्यास या गोष्टी ध्यानात घेऊन चीनने मिमांग चेटोन'ची गँग उभी केली आहे. पूर्व लडाखमध्ये मागच्यावर्षीच एप्रिल-मे पासून भारत आणि चिनी सैन्यामध्ये संघर्ष सुरु आहे. चीन मिलिशियाची भरती करण्याबरोबरच स्पेशल तिबेट आर्मी युनिटही बनवत आहे. "या स्पेशल तिबेट आर्मी युनिटमधील सैनिकांना प्रशिक्षणानंतर तिबेटीयन धर्मगुरुंच्या आशिर्वादासाठी नेले जाते" असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा, अपहरणात वडिलांचा सहभाग; गुन्ह्यातली कार घराबाहेर, आईने पोलीसांवर सोडले कुत्रे

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

SCROLL FOR NEXT