Kanpur NDTV
देश

व्यापाऱ्याच्या घरी नोटांनी भरलेले कपाटं पाहुन चक्रावले आयकर अधिकारी

नोटा मोजण्यासाठी मशिन वापरण्यात आले, तरी लागले २४ तास

सुधीर काकडे

कानपूरमधील अत्तर (Perfume) व्यापारी पियुष जैन यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. छाप्यादरम्यान आयकर विभागाला मोठं घबाड सापडलं आहे. नोटांनी भरलेल्या कपाटांच्या रांगा पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे चक्रावले. या नोटा मोजण्यासाठी टीमला अनेक तास लागले. पियुष जैन (Piyush Jain) यांच्या घराबाहेर आतापर्यंत नोटांनी भरलेले 6 बॉक्स ठेवण्यात आले आहेत. आयकर विभागाचे पथक हे बॉक्स ताब्यात घेण्याची तयारी करत आहे.

डीजीजीआय आणि इन्कम टॅक्सने गुरुवारी कन्नौजचे अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या कानपूरमधील (Kanpur) घरावर छापा टाकला. या दरम्यान कपाटांमध्ये एवढी रक्कम सापडली की, ती मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याचं मशीन मागवावं लागलं. छापा टाकल्यानंतर सुमारे २४ तास ही कारवाई सुरू होती.

यापूर्वी जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल अहमदाबादच्या टीमने छापा टाकला होता, पण जेव्हा पीयूष जैन यांना नोटांचे ढिगारं मिळू लागले तेव्हा त्यांनी इन्कम टॅक्स टीमला पाचारण केले. नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या असून, चोवीस तास नोटांची मोजणी सुरू होती. विशेष म्हणजे या नोटा घेऊन जाण्यासाठी इन्कम टॅक्सने आतापर्यंत ६ मोठे स्टीलचे बॉक्स मागवले आहेत. ही कारवाई अजूनही संपलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT