Pervez Musharraf shakes hand with Atal Bihari Vajpayee esakal
देश

Pervez Musharraf : मुशर्रफांनी वाजपेयींना शेकहॅण्ड केलं अन् नंतर 'पाक'ला झाप झापलं; जाणून घ्या काय आहे किस्सा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालंय.

सकाळ डिजिटल टीम

1947 मध्ये फाळणी झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.

Pervez Musharraf Passed Away : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालंय. दुबईतील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेला बराच काळ ते आजारी होते.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलंय. उपचारांदरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मुशर्रफ 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. 1999 ते 2008 या काळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. तसंच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून ते काम करत होते.

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि परवेझ मुशर्रफ यांचं सार्क परिषदेतील 'हस्तांदोलन' बरंच गाजलं होतं. त्याची आजही चर्चा होते. 2002 मध्ये म्हणजे अगदी 20 वर्षांपूर्वी देशाचे राष्ट्रपती झालेले पाकिस्तानचे जनरल परवेझ मुशर्रफ आणि वाजपेयी यांच्यात सार्कमधील हस्तांदोलनानं जगाला नवी उमेद दिली. मुशर्रफ यांनी स्वत: त्या हस्तांदोलनाला त्यांच्यासाठी अत्यंत कठीण क्षण असल्याचं वर्णन केलं.

1947 मध्ये फाळणी झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. 4 ते 6 जानेवारी 2002 या कालावधीत नेपाळची राजधानी काठमांडू इथं 11 वी सार्क शिखर परिषद झाली. भारतीय संसदेवरील हल्ला, कारगिल युद्ध आणि ऐतिहासिक आग्रा परिषदेनंतर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुशर्रफ आले होते. भारतासोबतचे सर्व प्रश्न शांततेनं सोडवायचे आहेत, असं मुशर्रफांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. यानंतर त्यांनी या परिषदेच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान वाजपेयी यांच्याकडं मैत्रीचा हात पुढं करत असल्याचं जाहीर केलं.

सार्क परिषदेत भाषण केल्यानंतर मुशर्रफ व्यासपीठावरून खाली येत होते. मुशर्रफ यांनी वाजपेयींशी हस्तांदोलन करून सर्वांना चकित केलं. पण, यानंतर वाजपेयींनी जे केलं, ते खुद्द मुशर्रफ यांनाही अपेक्षित नव्हतं. मुशर्रफ हे पाकिस्तानी लष्कराचेही जनरल होते. त्यांनीच कारगिलची कथा लिहिली आणि नंतर तोंडघशी पडले. भाषण संपवून आसनावर जाण्यापूर्वी मुशर्रफ वाजपेयींच्या जवळ आले आणि त्यांनी हात पुढं केला. याकडं वाजपेयी दुर्लक्ष करू शकले नाहीत. तेही आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनीही मुशर्रफांशी हॅण्डशेक केलं.

Pervez Musharraf shakes hand with Atal Bihari Vajpayee

मुशर्रफांची 'ती' योजना फसली

मुशर्रफांना या हस्तांदोलनानं जगाला सांगायचं होतं की, पाकिस्तानला अजूनही भारताशी मैत्री आणि शांतता हवी आहे. या घटनेबाबत भारत आणि पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी या हॅण्डशेकवर लिहिलं की, दहशतवादाचा धोका कायम असताना, मुशर्रफ आणि वाजपेयी यांच्यात दिसून आलेली 'मैत्री' खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. मुशर्रफांना हात जोडून आपली वेगळी प्रतिमा नक्कीच मांडायची होती. पण, वाजपेयींच्या भाषणानं त्यांची योजना उधळली गेली.

प्रत्येक वेळी पाकिस्ताननं भारताचा विश्वासघात केला

वाजपेयींनी हस्तांदोलन केलं खरं, पण नंतर काही सेकंदांनी त्यांनी मुशर्रफ यांना चोख प्रत्युत्तर दिलं. सार्क परिषदेत वाजपेयी म्हणाले, 'राष्ट्रपती मुशर्रफ यांनी माझ्याकडं मैत्रीचा हात पुढं केला, याचा मला आनंद आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. मात्र, मुशर्रफांना वचन द्यावं लागेल की ते पाकिस्तान किंवा त्यांच्या सीमेवर भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवाया वाढू देणार नाहीत.' भारत नेहमीच पाकिस्तानसोबत मैत्रीच्या बाजूनं राहिला आहे, याची आठवण करून देण्यासही वाजपेयी विसरले नाहीत. प्रत्येक वेळी पाकिस्ताननं भारताचा विश्वासघात केला आहे. लाहोरनंतर भारताला कारगिल युद्धाची भेट मिळाली, असंही वाजपेयींनी कडक शब्दांत मुशर्रफांना सुनावलं होतं. त्यांचा हा किस्सा आजही ताजा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT