Pet Parents esakal
देश

Pet Parents: मांजरीसाठी कोयत्याने हल्ला, कुत्र्यासाठी गोळीबार, पेट पॅरेंटींग विकृत होतेय का?

मानसिक आजार दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ प्राणी पाळण्याचा सल्ला देतात.

धनश्री भावसार-बगाडे

Why Are Pet Parents Becoming Aggressive In Marathi :

भूतदया, जीवदया हे आपल्याला अनंत काळापासून सांगितले गेले आहे. समाजात त्याचे आचरण करणारे अनेक प्राणी प्रेमीही आढळतात. प्राण्यांच्या संगतीत माणसाचा एकटेपणा दूर होतो. ताण कमी होतो. यासाठीच मानसोपचार तज्ज्ञ देखील पेट थेरपीचा उपयोग करतात.

अनेक जण खरोखर प्राणी प्रेमी म्हणून कुत्रा, मांजर, पक्षी, गाया, म्हशी, इतर प्राणी पाळतात. तर काही जण आपल्या प्रतिष्ठेचा भाग म्हणून एखादा तरी पाळीव प्राणी असावा या हेतूने प्राणी पाळतात. घरातल्या एखाद्या मुलाची घ्यावी तशी या प्राण्यांची काळजी घेतली जाते.

पण हल्ली या जनावरांना माणसाळणारे माणसंच मात्र जनावरांसारखे आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहेत.

पाळीव प्राण्यांवरून नुकत्याच काही जीवघेण्या घटना घडल्या आहेत. एका मांजरीवरून कोयता घेऊन हाणामारी, कुत्र्यांवरून गोळीबार, अॅसिड फेकणे अशा विकृत घटना घडल्याचे दिसते. त्यावेळी मानसिक आरोग्य देणाऱ्या पाळीव प्राण्यांचे पालक असे विकृत, रागीट, आक्रमक का झालेत असा प्रश्न सहाजिकच पडतो. नक्की घडले काय जाणून घेऊया.

मांजर गायब झाल्याच्या कारणावरून हाणामारी

इचलकरंजीच्या हातकळंगले तालुक्यातील कबनूर परिसरात मांजर गायब झाल्याच्या संशयावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाले. तो वाद पुन्हा उफाळून येत कोयता, लोखंडी सळया घेऊन दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटाचे लोक जबर जखमी झाले. यात घरातील वस्तूंच नुकसानही झाले.

कुत्र्यांच्या भांडणात मालकांमध्ये रक्तरंजित संघर्ष

मध्यप्रदेशातल्या इंदोरमध्ये एका बँकेचा सुरक्षारक्षक पाळीव कुत्र्यास फिरवायला घेऊन गेला. तिथे शेजारच्याचा कुत्रा आला. दोन्ही कुत्रे भांडू लागले. हे बघून दुसऱ्या कुत्र्याचा मालक बाहेर आला. सुरक्षा रक्षक आणि दुसऱ्या मालकात वाद झाला. यात कुटुंबियपण आले. रागात सुरक्षारक्षकाने आपली परवाना धारक बंदुकीने पहिल्या मजल्यावरून या दुसऱ्या मालकावर व कुटुंबियांवर बेझूट गोळीबार केला. त्यात दोघांचा मृत्यू आणि इतर गंभीर जखमी झाले.

महिलेने फेकले पाळीव कुत्र्यावर अॅसिड

मुंबईतील मालवणी परिसरात पाळीव कुत्र्यावर महिलेनं अॅसिड फेकलं. ही घटना मालवणीतील एका सोसायटीच्या आवारात ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT