Chennai BJP office esakal
देश

मध्यरात्री भाजप कार्यालयावर भ्याड हल्ला; अज्ञातांनी फेकला Petrol Bomb

सकाळ डिजिटल टीम

या हल्ल्यानंतर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.

तामिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी चेन्नई येथील भाजप कार्यालयावर (Chennai BJP office) रात्री उशिरा पेट्रोल बॉम्ब (Petrol bomb) फेकण्यात आलाय. या हल्ल्यानंतर भाजप नेते कराटे त्यागराजन (BJP leader Karate Tyagarajan) यांनी संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले, भाजप अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. भिक घालत नाही. आमच्या कार्यालयावर मध्यरात्री दीड वाजता पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. 15 वर्षांपूर्वी द्रमुकच्या बाबतीतही अशीच एक घटना घडली होती. या हल्ल्यानंतर आम्ही तामिळनाडू सरकारचा जाहीर निषेध करतोय. याबाबत आम्ही पोलिसांना (Police) बोलावलं असून ही बाब भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कळवलीय, असं त्यांनी सांगितलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप कार्यालयावर हल्ला केलेले बदमाश दुचाकीवरून आले होते. दरम्यान, कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकून बदमाशांनी तेथून पळ काढलाय. आनंदाची बाब म्हणजे, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हल्ल्याची माहिती मिळताच कार्यालयाजवळ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले आहेत. पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपकडून (BJP) केली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

Video: स्कूल व्हॅनला ट्रेनची जोराची धडक, ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांचा मृत्यू; रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना दुर्दैवी अपघात

NEET-UG मध्ये 670 गुण; अतुल्या डोंगरेची AIR मध्ये 498 वी रँक

Matheran Mini Train : माथेरानची 'राणी' हायड्रोजन इंजिनवर धावणार!

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

SCROLL FOR NEXT