Nepal esakal
देश

करात कपात करुन देखील भारतातील लोक पेट्रोल भरायला जाताहेत नेपाळला

सकाळ डिजिटल टीम

महागाईमुळं सामान्य नागरिक त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेय.

महागाईमुळं सामान्य नागरिक त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) दरात प्रचंड वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेय. केंद्र व राज्य सरकारनं करात कपात करण्याची घोषणा करून जनतेला किरकोळ दिलासा दिलाय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत जनतेत नाराजी पसरली होती. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केलेल्या कपातीचा फायदा नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या भागातील लोकांना घेता येत नाहीय.

बिहार (Bihar) आणि नेपाळच्या (Nepal) सीमेला लागून असलेल्या भागात राहणारे लोक याचा फायदा घेऊ शकत नाहीत, याचं मुख्य कारण नेपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी सीमावर्ती भागातील लोक नेपाळकडे वळत आहेत. भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर खूपच कमी आहेत.

नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिहारमधील रक्सौलमध्ये (Raxaul) पेट्रोलचा दर 107 रुपये 92 पैसे आणि डिझेलचा दर 92 रुपये 98 पैसे प्रति लिटर आहे. रक्सौलमधील पेट्रोल आणि डिझेलचे हे दर भारत सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या कर सवलतीनंतरचे आहेत. बिहारच्या दृष्टीने आजही नेपाळमध्ये पेट्रोल 25 रुपये 17 पैशांनी आणि डिझेल 20 रुपये 95 पैशांनी स्वस्त आहे.

रक्सौलला लागून असलेल्या नेपाळच्या पारसा जिल्ह्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 132.25 नेपाळी रुपये किंवा 82.65 भारतीय रुपये आहे. त्याचप्रमाणे, डिझेलची किंमत देखील 115.25 नेपाळी रुपये किंवा 72.03 भारतीय रुपये प्रति लिटर आहे. विशेष म्हणजे, बिहार आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात नेपाळी रुपया व्यवहारात चलनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT