Petrol diesel prices see big hike in Delhi 
देश

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवला असला तरी झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने पेट्रोलचे दर १.६७ रू प्रती लिटरने वाढवण्याचा निर्णय घेतला असून डिझेलच्या दरात ७.१० रू प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या दरानुसार दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७१.२६रू. प्रती लिटर तर डिझेलचे दर ६९.२९ रू प्रती लिटर इतके आहे. 

गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलची विक्री ६१ टक्के तर डिझेलची विक्री ५७ टक्क्यांनी घसरली. शिवाय इंधनांवर लागणारे कर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नागालँड, आसाम आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. नागालँडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना टॅक्स लावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mannat Snake Viral Video: नागपंचमीला शाहरुख खानच्या 'मन्नत' मध्ये खऱ्याखुऱ्या सापांची एंट्री; सगळेच घाबरले; कोणत्या जातीचा होता साप?

Lamgavhan Burglary Case: लामगव्हाण घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; १.९८ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Talegaon Dhamdhere PMRDA Road Work: तळेगाव ढमढेरेत रस्तारोकोनंतर पीएमआरडीएचा बाह्यवळण रस्ता कामाला पुन्हा गती; ग्रामस्थ समाधानी

Education News: बौद्धिक क्षमता वाढवा, नोकऱ्या तुमच्याकडे येतील; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Pune traffic: पुण्यात पोलिस रस्त्यावर उभं राहून ई-चलन करणार नाहीत! प्रायोगिक तत्त्वावर निर्णय; उच्चस्तरीय बैठक संपन्न

SCROLL FOR NEXT