Photo Journalism in kashmir one photo speaks a thousand words 
देश

काश्मिरमधील फोटो पत्रकारिता: जेव्हा एक फोटो हजारो शब्द बोलून जातो...

शेरॉन सिंग

नवी दिल्ली- काही वेळा शब्द कमी महत्वाचे वाटतात आणि शाईने पांढऱ्या कागदावर काढलेली अक्षरे केवळ ठिपके ठरतात. अशावेळी तीने काढलेले फोटो आमच्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात, अशी प्रतिक्रिया काश्मिरमधील काही तरुण पत्रकारांनी दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

24 वर्षीय मुसाहरत जाहरा या स्वतंत्र्यरित्या काम  करणाऱ्या काश्मीरमधील पहिल्या महिला फोटो पत्रकार आहेत. त्यांच्यावर देशविरोधी फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी अनलॉफुल अॅक्टिवीटी प्रिवेन्शन अॅक्टनुसार(UAPA) गुन्हा दाखल आहे. जाहरा जेव्हा गोळीबार, दगडफेक, अश्रुधूर अशा वातावरणात काम करायच्या तेव्हा लोकांनी त्यांना मुखबीर असे लेबल लावलं.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
काश्मिरच्या लोकांनी हिंसक वातावरणात काम करणाऱ्या महिला फोटो पत्रकाराला कधी पाहिलं नव्हतं. त्यांच्यासाठी हे नवीन होतं. त्यांना वाटायचे मी माहितीदार आहे. त्यामुळे लोकांनी माझी हेटाळणी केली, तसेच मला मुखबीर ठरवलं. यामुळे मी खूप निराश झाले, अशी प्रतिक्रिया जाहरा यांनी दिली आहे.

काश्मिरमधील तीन फोटो पत्रकारांना यावर्षीचा पुलीत्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. दार यासीन, मुख्तार खान आणि चेन्नी आनंद यांना काश्मिर खोऱ्यातील कठीण परिस्थितीत करण्यात आलेल्या फोटो पत्रकारीतेसाठी पुरस्कार मिळाला आहे. जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याच्या काही महिन्यानंतर त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

काश्मिरमधील फोटो पत्रकारांना पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी यावर टीका केली. भारतातील अनेक मान्यवरांनी पत्र लिहून पुलित्झर पंचाकडे याबाबतचा आक्षेप घेतला. तसेच या पुरस्काराच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले. पुलित्झर हा पुरस्कार चांगल्या पत्रकारीतेला प्रोत्याहन देण्यासाठी आहे. मात्र, दार यासीन आणि मुख्तार खान यांच्या सारख्यांना पुरस्कार देऊन खोट्या आणि विभाजनवादी पत्रकारीतेला तुम्ही प्रोत्साहन देत आहात, असा आरोप पत्रात करण्यात आला होता.

स्वतंत्ररित्या काम करणारे फोटो पत्रकार शराफत अली यांनी काश्मिरमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.  जेव्हा मी खोऱ्यामध्ये काही स्टोरी करण्यासाठी जातो, तेव्हा मी वापस घरी येईन का याची शाश्वती नसते. गोळीबार, दगडफेक अशा परिस्थितीत लष्कराच्या उपस्थितीत फोटो घेणे फार अवघड आहे. त्यासोबत सुरक्षा तपासणीतून कॅमेरा स्वत:च्या जबाबदारीने घेऊन जाणे अत्यंत जोखमीचं आहे. शिवाय, काश्मिरमधल्या 2G नेटवर्कच्या साह्याने फोटो अपलोड करणे म्हणजे संपूर्ण दिवस घालवणे असंच काम आहे, अशी व्यथा अली यांनी व्यक्त केली आहे.

फोटो पत्रकार एखादी स्टोरी करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतात. खोऱ्यातील लोकांच्या व्यथा समोर आणण्यासाठी प्रयत्न करतात. अशा स्टोरी करण्यासाठी वर्षाचा कालावधीही लागतो. ते हे सर्व करतात कारण ते पत्रकार असण्या पूर्वी एक माणूस आहेत. त्यामुळे त्यांना आज गरज आहे ती प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT