देश

Video: कचऱ्याच्या गाडीत फेकले मोदी, योगींचे फोटो; पालिका कर्मचारी निलंबीत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो कचऱ्याच्या ट्रकमध्ये टाकण्यात आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने कचऱ्याच्या गाडीवरील कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. (pm modi and yogi adityanath news in marathi)

नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला थांबवून पंतप्रधानांसह इतर लोकांचे फोटो कचऱ्याच्या गाडीत ठेवण्याबाबत जाब विचारला. त्यावर कर्मचारी म्हणाला की, या फोटोंशी माझा काहीही संबंध नाही. कचऱ्यात फेकण्यात आले तेच मी उचलून आणले. मथुरेत कचऱ्याची गाडी घेऊन जाणाऱ्या या कर्मचाऱ्याला काही लोकांनी पहिले आणि अडवले. यानंतर कर्मचारी आणि त्याच्या गाडीचा व्हिडिओ बनवण्यात आला.

दरम्यान, उपस्थितांनी कचऱ्यात पडलेले सर्व फोटो बाहेर काढून स्वच्छ केले. यावेळी एका व्यक्तीने म्हटलं की, आम्ही मोदीजी आणि योगीजींचे फोटो अलवरला घेऊन जाऊ. ते या देशाचा आत्मा आहे, त्यामुळे त्यांचे फोटो अशाप्रकारे कचऱ्यात टाकू देणार नाही. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी म्हटले की, पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ हे संवैधानिक पदावर बसले आहेत, अशा परिस्थितीत त्यांचा फोटो अशा कचऱ्याने ठेवणे योग्य नाही.

या संपूर्ण प्रकरणाबाबत मुथरा-वृंदावन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सत्येंद्र कुमार तिवारी म्हणाले की, कर्मचाऱ्याने चुकून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो कचऱ्याच्या गाडीत ठेवले. याबद्दल आम्ही संबंधित कर्मचाऱ्याला निलंबीत केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT