Photographer Arjun Krishnan Changes Girls Kisbu esakal
देश

फुगं विकणाऱ्या मुलीचं रातोरात बदललं 'आयुष्य'

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियाच्या या दुनियेत कधी कोणाचं 'आयुष्य' बदलेलं हे सांगता येत नाही.

सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) या दुनियेत कधी कोणाचं 'आयुष्य' बदलेलं हे सांगता येत नाही. जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यानं लोकांचं नशीब बदललंय. अर्शद खान या पाकिस्तानातील (Pakistan) चहा विक्रेत्याचं उदाहरण घ्या.. त्याचा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, तो रातोरात स्टार झाला. आता एका जत्रेत मुलगी फुगं विकत असल्याचा फोटो व्हायरल झाला असून याची जोरदार चर्चा सुरुय. फोटोग्राफरनं इतका सुंदर फोटो क्लिक केलाय की, त्या फोटोवर अनेकजण फिदा झालेत. मुलीच्या मेकओव्हर फोटोमुळं सोशल मीडियावर 'ती' चांगलीच चर्चेत आलीय.

पय्यान्नूर (Payyannur) येथील छायाचित्रकार अर्जुन कृष्णन (Photographer Arjun Krishnan) यानं कन्नूर अंडाल्लुरकावू महोत्सवात एका फुगं विक्रेत्या मुलीचा फोटो काढला. ती मुलगी जत्रेत फुगे आणि दिवे विकत एका कोपऱ्यात उभी होती. यावेळी मुलीचं लक्ष नसताना फोटोग्राफरनं तिचा सुंदर फोटो काढला, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही मुलगी राजस्थानमधील (Rajasthan) असून किसबू असं तिचं नाव आहे.

फोटो काढल्यानंतर अर्जुननं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आणि त्याला जबरदस्त प्रतिसादही मिळाला. अर्जुनचा मित्र श्रेयसनंही किसबूचा सुंदर फोटो काढला. या फोटोत तिचा चेहरा बरंच काही सांगून जात आहे. त्यानंतर लगेचच अर्जुनला किसबूसोबत मेकओव्हर फोटो शूट करण्यासाठी बोलावण्यात आलं. अर्जुननं स्टायलिस्ट रेम्याच्या मदतीनं किसबूचे काही सुंदर फोटो शूट केले. रेम्यानं केरळ सेट मुंडू आणि पारंपरिक दागिन्यांसह किसबूला एक जबरदस्त मल्याळी मेकओव्हर (Malayali Makeover) दिलाय. या मेकओव्हरचं केवळ कौतुकच झालं नाही, तर किसबूला अनेक ऑफर्सही मिळाल्या आहेत. अर्जुन हा फ्रीलान्स वेडिंग फोटोग्राफर आहे, जो 15 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. या फोटोशूटनंतर त्याचं खूप कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांचा उंबरखिंडीत लढतानाचा AI व्हिडिओ व्हायरल! फक्त ४ तासांत इतिहास उलटला, २५ हजार मुघल गारद

"मेरे लाईफ में हिरो की एंट्री हो गयी है"; तुला पाहते रे फेम गायत्री दातारच्या आयुष्यात खऱ्या विक्रम सरंजामेची एंट्री !

Maharashtra Politics : पुढील दोन महिन्यांत मोठा राजकीय बदल; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील - ॲड. प्रकाश आंबेडकर!

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Latest Marathi News Live Update: सातारा बामणोलीत ड्रग्ज छापा

SCROLL FOR NEXT