UP Crime News
UP Crime News esakal
देश

पिटबुल कुत्र्याचा 80 वर्षाच्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला; तासभर तोडत होता शरीराचे लचके

सकाळ डिजिटल टीम

पिटबुलनं 80 वर्षीय वृध्द महिलेवर भयानक हल्ला केलाय.

लखनौ : आपल्याला कुत्र्यांची दहशत ठावूक आहे. पण, मोकाट कुत्र्यानं माणसांवर हल्ला केल्याच्या तुम्ही अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, पाळीव कुत्र्यानंच आपल्या मालकीणीवर हल्ला (Dog Attacked) केल्याची घटना दुर्मिळ म्हणावी लागेल. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्याची (UP Crime News) ही बातमी कोणाच्याही मनात भीती निर्माण करणारी आहे. असंच काहीसं प्रकरण युपीत घडलंय.

पिटबुलमुळं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण

पिटबुलनं 80 वर्षीय सुशीला त्रिपाठी यांच्यावर भयानक हल्ला केला. पिटबुलनं सुशीला यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले, जे पिटबुलनंही खाल्ले आहे, असा शेजाऱ्यांचा दावा आहे. या पिटबुलमुळं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशातील लखनौच्या कैसरबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडना उघडकीस आलीय. पाळवी पिटबुल जातीच्या (Pitbull Dog) कुत्र्यानं घरातील 80 वर्षांच्या वृद्धेवर हल्ला केला. गच्चीत या कुत्र्याला फिरवण्याच्या उद्देशानं ही महिला कुत्र्याला घेऊन आली होती. त्यावेळी थरारक घटनेत या कुत्र्यानं वृद्धेवर हल्ला चढवला.

कुत्र्यानं महिलेचं मांस शरीरावेगळं केलं

दरम्यान, आपल्या धारदार दातांनी या महिलेच्या शरीराचा चावा कुत्र्यानं घेतला. त्यात गंभीर जखम झालेल्या महिलेचा जीव गेलाय. कैसरबाग ठाणा अध्यक्षांनी याबाबत अधिक माहिती दिलीय. या घटनेत मृत्यू झालेली महिला ही एक निवृत्त शिक्षिका होती. 80 वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेवर घरातील पिटबुल जातीच्या कुत्र्यानं हल्ला चढवला. हा हल्ला अंगावर काटा आणणारा असा होता. या हल्लात कुत्र्यानं महिलेचं मांसही शरीरावेगळं केलं होतं.

शेजाऱ्यांकडून पिटबुलवर दगडफेक

या हल्लावेळी महिला घरात एकटीच होती. तर तिचा मुलगा ही व्यायामशाळेत गेला होता. जीम ट्रेनर असलेला या महिलेचा मुलगा जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला हा सगळा प्रकार पाहून मोठा धक्काच बसला. दरम्यान, या महिलेच्या पतीचा आधीच मृत्यू झाला होता. शेजारी सांगतात, 'सुशीला त्रिपाठी ओरडत होत्या, आम्ही पिटबुलवर दगडफेक करायला सुरुवात केली, पण तो थांबला नाही आणि लचके तोडत राहिला. आम्ही सुमारे तासभर दगडफेक करत राहिलो, त्यानंतर त्यांनी सुशीला यांचा मृतदेह ओढून आत नेला. सुमारे तासभर कुत्रा वृद्ध महिलेचे लचके तोडत असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT