Attempt to exchange counterfeit 2000 notes in bank accused arrested crime police mumbai  Sakal
देश

2000 Bank Note: आयडी प्रूफशिवाय 2000च्या नोटा बदलताना येणार का? सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं

सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : रिक्वेजिशन स्लीप आणि ओळखपत्राशिवया 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं लोकांना दिली आहे. बँकेच्या या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर २००० रुपयांच्या नोटात आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. (Plea challenging permition of exchange of Rs 2000 banknotes without any ID proof declines by Supreme Court)

पैसे भरण्याची स्लीप आणि ओळखपत्राशिवाय 2000 रुपयाच्या नोटा बँकांमधून बदलण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पण बँकेचा हा निर्णय काळ्या पैशाची नोंद ठेवण्यास अडचणीचा ठरणारा आहे, त्यामुळं बँकेच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती, या याचिकेची दखल घेण्यास कोर्टानं नकार दिला आहे.

कोर्टाच्या या भूमिकेमुळं ज्या लोकांनी अद्यापही 2000 हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेतलेल्या नाहीत. तसेच ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर 2000 रुपयांच्या नोटांची रोकड आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं या नोटा आहेत त्यांनी त्या बँकांमधून बदलून घ्याव्यात असं आवाहन बँकेडून करण्यात आलं होतं. यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून एकाच वेळी बाद करण्यात आल्या होत्या त्यानंतर त्याला पर्याय म्हणून पुन्हा ५०० रुपयांची नवी नोट आणि २००० रुपयांची नोट चलनात दाखल झाली होती. दरम्यान, तात्पुरत्या वापरानंतर २०१८-१९ मध्ये या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं बंद केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT