PM Kisan Fund
PM Kisan Fund esakal
देश

PM Kisan Fund: ‘या’ तारखेदरम्यान जमा होणार १२वा हप्ता

अंकिता खाणे (Ankita Khane)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले असून, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 12 वा हप्ता जमा होणार आहे.

31 मे 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी 11व्या हप्त्याचे 2000 रुपये 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. अशा परिस्थितीत, 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये 1 सप्टेंबर 2022 नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होतील अशी अपेक्षा आहे. कारण आर्थिक वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान येतो. दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतो. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान 12 वा हप्ता येऊ शकतो, असे कृषी विभागाशी संबंधित सूत्रांचे सांगितले आहे.

दुसरीकडे, सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. यावेळी सरकारकडून ई-केवायसीची तारीख वाढवली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही आज आणि उद्या ई-वायसी केले नाही तर तुम्हाला भविष्यात पीएम किसान निधीचा लाभ मिळणार नाही.

अशा प्रकारे ई-केवायसी करा

1) ई-केवायसी करण्यासाठी, प्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा, pmkisan.gov.in.

2) येथे शेतकऱ्याच्या कोपऱ्यात, माऊस ओव्हर करा आणि E-KYC टॅबवर क्लिक करा.

3) उघडलेल्या नवीन वेब पृष्ठावर, आधार क्रमांक टाका आणि शोध टॅबवर क्लिक करा.

4) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

5) OTP सबमिट केल्यानंतर येथे क्लिक करा.

6) आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी त्याठिकाणी टाका आणि तुमचे ई-केवायसी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT