Pm Kisan scheme News
Pm Kisan scheme News esakal
देश

पीएम किसान योजनेत महत्त्वाचे बदल, आता 'या' कागदपत्रांची करावे लागेल पूर्तता

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार आता नोंदणीच्या (रजिस्ट्रेशन) दरम्यान राशन कार्डशी संबंधित सर्व माहिती देणे आवश्यक केले आहे. आता तुम्हाला नोंदणी करताना राशन कार्डही अपलोड करावे लागेल. अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही. (PM Kisan Samman Yojana New Changes In This Scheme, These Documents Compulsory)

या बरोबरच सरकारने योजनेचे लाभ सुरु राहण्यासाठी ई-केवायसी भरणेही अनिर्वाय केले आहे. वास्तविक सरकारने पीएम किसान सन्मान योजनेत होत असलेल्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे बदल केले आहेत. या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य पती किंवा पत्नीच पैसे घेऊ शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे, की ज्या शेतकऱ्यांजवळ राशन कार्ड आहे, त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या बरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांकासह मागितलेले कागदपत्रांची साॅफ्ट काॅपी अपलोड करणे ही आवश्यक आहे.

ई-केवायसी आहे आवश्यक

शेतकऱ्यांना (Farmer) ई-केवायसी करण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांना लाभ मिळालेला नाही. जर तुम्ही ई केवायसी केले नसेल तर लवकरात-लवकर ते करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT