pm modi.jpg 
देश

धक्कादायक! PM किसान योजनेत 5.96 लाखांपैकी 5.38 लाख लाभार्थी बनावट

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्सांठी केंद्र सरकारने  24 फेब्रुवारी 2019 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  (PM Kisan samman nidhi Scheme) सुरु केली होती. पण आता या योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. तामिळनाडूमध्ये 5 लाख 95 हजार जणांनी या योजनेसाठी बॅंक अकाउंट (Bank Account) सुरु केले होते, त्यातील तब्बल 5 लाख 38 हजार जण बोगस लाभार्थी निघाले आहेत. आता ज्या बॅंकातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवले गेले होते, त्या बॅंकानी आता ते पैसे माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. हे माघारी आलेले सर्व पैसे आता केंद्र सरकारकडे वर्ग केले जाणार आहेत. आतापर्यंत 61 कोटी रुपये बॅंकानी वसूल केले आहेत.

या घोटाळ्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, आतापर्यंत 96 कंत्राटावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकले आहे. बोगस अकाउंटला कारणीभूत असणाऱ्या 35 आधिकाऱ्यांविरुध्द विभागीय चौकशी सुरु आहे. तसेच 3 गटविकास आधिकारी आणि 5 साहाय्यक आधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. ह्या सर्वांवर पासवर्डचा दुरुपयोग केल्याचे आरोप आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह 52 जणांवर एफआयआर दाखल करून अटक केलं आहे.   

कसा झाला घोटाळा-
पंतप्रधान मोदींसाठी ही योजना महत्वाची योजना होती. आता या योजनेतच मोठा घोटाळा झाल्याने मोठा धक्का बसला आहे. हा घोटाळा समोर आल्यावर आता राज्य सरकारने चौकशी सुरु केली आहे. यावरून हे समजले आहे की काही भ्रष्ट लोकांनी या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लोकांचं बुकींग जिल्हातील आधिकाऱ्यांच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डचा दुरुपयोग केला होता. 

कषी विभागात काही कंत्राटी कामगारही या गैरकृत्यात सामिल झाल्याचे सिध्द झालंय. राज्य सरकारने लगेच आधिकाऱ्यांचे पासवर्ड बदलले आहेत. या मोठ्या घोटाळ्यामुळे आता राज्य सरकार पुढील सगळी पाऊले विचार करुन उचलत आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु आहे. यावर केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, शेतकऱ्यांच्या परिवारांची शहनिशा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.   

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT