PM Kisan Yojana update  esakal
देश

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेवर कृषी मंत्री तोमर यांचं महत्वपूर्ण वक्तव्य

राज्यातील कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोमर यांनी पीएम किसान योजनेबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केलंय

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रसरकार अनेक योजना चालवत असतात. त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा होतो. कृषी मंत्री तोमर यांनी घेतलेल्या बैठकीत आज देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांना बोलावून त्यांचं मत जाणून घेण्यात आलं. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड,हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, पंजाब,राजस्थान,आसाम, अरूणाचल प्रदेश इत्यादी राज्यातील कृषी मंत्र्यांनी त्यांचे विचार सदर बैठकीत मांडले. (PM Kisan Yojana update)

केंद्रिय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यातील कृषी मंत्र्यांसोबत घेतलेल्या एका वर्च्युअल बैठकीत शेतकऱ्यांच्या विकासाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान योजनेस पात्र असणारा कुठलाही शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये असे आदेश देण्यात आले. तसेच देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा लवकऱ्यात लवकर जमा करून अपडेट करण्यासही सांगितले आहे.

माहितीसाठी दरवर्षी पीएम किसान योजनेअंतर्गत योजनापात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांच्या तीन इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त धनराशी ११.३७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांजवळ जमीन आहे त्यांनाच मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT