pm kisan yojana  sakal
देश

शेतकऱ्यांसाठी खुश खबर, खात्यात दरवर्षी जमा होणार ३६ हजार रुपये, जाणून घ्या अटी..

सरकारच्या योजने अंर्तगत शेतकऱ्यांना दरमहिना 3,000 रुपये पेन्शन मिळणार

सकाळ ऑनलाईन

जर तुमचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ही बातमी श्रीमंत करेल. पंतप्रधान मोदींच्या सरकारने आता वृद्धांसाठी अशी योजना सुरू केली आहे, ज्यातून दरमहा पेन्शन दिली जाईल. या योजनेच नाव आहे PM किसान मानधन योजना. ज्याचा वयवृध्द लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

* पीएम किसान मानधन योजनाचे वैशिष्ट्ये

१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेत असणे आवश्यक आहे.

२) या योजनेअंतर्गत तुम्हाला दर माहिन्याला 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल. म्हणजेच एका वर्षी तुमच्या खात्यांत 36,000 रुपये ऐवढी रक्कम येतं जाईल.

* पीएम किसान मानधन योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे जाणुन घ्या?

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन केल्यावरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

१)सर्वप्रथम तुमचे पीएम किसान सन्मान निधीमध्ये नाव असणे गरजेचे आहे. यासाठी तुमचे वय ६० वर्षे असणे आवश्यक आहे.

२) जर तुम्ही दिवसांचे 2 रुपये वाचवले तर तुम्ही दरवर्षी 36,000 रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता. या अंतर्गत तुम्हाला दरमहा 55 रुपये आपल्या पीएम किसान सन्मानच्या खात्यावर जमा करावे लागतील.

३)जर एखादी व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सामील झाली तर त्याला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

४) या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अटी पुर्ण असल्या की पुढच्या टप्पा असतो.

*पीएम किसान मानधन योजनेचा फॉम कुठे भरायचा ?

तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजेच CSC सेंटरला जाऊन या योजनेसाठी फॉम भरावा लागेल.

कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती केंद्र सरकारकडे जाईल.

*पीएम किसान मानधन योजनेचा फॉम भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जनधन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल.

याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून वेळेत पेन्शनसाठी त्याच्या बँक खात्यातून पैसे कापता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

Pune Girls Safety Crisis: बालिकांवरील लैंगिक अत्याचारांची मालिका; पुणेकरांचा संतप्त सवाल – ‘पुण्यात लेकी सुरक्षित आहेत तरी कुठे?’

HSC Exam Result : अंध मुलींचे बारावी परीक्षेत यश; जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फॉर ब्लाइंड गर्ल्सचा १००% निकाल कायम

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

SCROLL FOR NEXT