vaccine 
देश

वॅक्सिनसाठीचे बॉक्स बनणार गुजरातमध्ये; मोदींनी स्वीकारला लक्झेमबर्गचा प्रस्ताव 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी कोरोना लशीची उपलब्धतता लवकरच होणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्झमबर्गच्या (Luxembourg) स्पेशल रेफ्रिजिरेटेड ट्रान्सपोर्टेशन प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार हा ट्रान्सपोर्टेशन प्लांट गुजरातमध्ये उभा केला जाण्याची योजना आहे. 

दिल्ली आणि अहमदाबाद स्थित अधिकारिक सूत्रांच्या माहितीनुसार, लक्झमबर्ग फर्म बी मेडिकल सिस्टम्स वॅक्सिन रेफ्रिजरेटर, फ्रीजर आणि ट्रान्सफोर्ट बॉक्स याच्यासह कोल्ड चेन स्थापित करण्यासाठी एक उच्च स्तरीय टीम पुढील आठवड्यात गुजरातमध्ये पाठवत आहे. अशा प्रकारचा सुसज्ज प्रकल्प उभा करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. कंपनी प्रशीतन बॉक्स तयार करणार आहे. प्रशीतन बॉक्स शून्याच्या खाली चार डिग्री सेल्सियस ते 20 डिग्री सेल्सियसदरम्यान डिलीव्हरी करण्यास सक्षम आहे. लक्झमबर्ग कंपनीकडे शून्य ते 80 डिग्रीच्या खाली वॅक्सिन ट्रान्सपोर्टचीही क्षमता ठेवते. 

बॉक्स मार्चमध्ये तयार होण्याची शक्यता

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर लक्झमबर्गच्या प्रस्तावावर स्वत: लक्ष्य ठेवून आहेत. यूरोपीय संघातील भारताचे राजदूत संतोष झा यांनी गुजरातमधील व्यवस्थेला अंतिम रुप देण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप-सीईओ यांची भेट घेतली होती. 

व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक Reliance Jio कडे; यावर्षी जोडले 9 कोटी सब्सक्राईबर्स

19 नोव्हेंबरला लक्झमबर्गने प्रधानमंत्री मोदी यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी द्विपक्षीय शिखर संम्मेलनादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासमोर बेटेल यांनी प्रस्ताव ठेवला होता. कोरोनाचे संकट लक्षात घेता मोदींना हा प्रस्ताव स्विकारला असल्याचे सांगितले जाते. शिवाय गुजरातसोबत संपर्क ठेवून असलेली कंपनी आणि लक्झेमबर्ग कंपनी यांच्यातर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला. 

दरम्यान, लक्झेमबर्ग ही एक आघाडीची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1979 मध्ये करण्यात आली होती. कंपनी ब्लड बँक आणि प्लाझ्मा स्टोरेज रेफ्रिजरेटरमध्येही जगात सर्वात पुढे आहे. भारतीय कंपनी लक्झेमबर्ग सोबत मिळून काम करणार असून यातून आत्मनिर्भर भारत योजनेलाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT