PM Modi ANI
देश

भारतात 'बूस्टर डोस' कधी आणि कुणाला मिळणार?

भारतात Booster Dose देण्यात येणार असला तरी मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर डोस असा शब्द मात्र वापरलेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

भारतात Booster Dose देण्यात येणार असला तरी मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर डोस असा शब्द मात्र वापरलेला नाही.

जगभरात आता ओमिक्रॉनने (Omicron) डोकेदुखी वाढवली आहे. या व्हेरिअंटला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही (India) अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मोदींनी बूस्टर डोस देण्यात येणार अशी घोषणा केली असली तरी डोसचा Precaution Dose असा उल्लेख केला आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर असा शब्द वापरला नाही. त्याऐवजी प्रतिबंधात्मक डोस असं म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासीयांना नाताळच्या शुभेच्छाही दिल्या. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती असल्याने कोरोनाविरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईसाठी काही नव्या उपाययोजनांची आजच घोषणा करणेही योग्य ठरले असे ते म्हणाले. ओमिक्रॉन या व्हेरिएंटने जगातील प्रत्येक देशाला प्रभावित केले असून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे असल्याचे मोदींनी नमूद केले.

कोरोनाप्रतिबंधक उपायांचे पालन करावे आणि सर्वांनी मास्क घाला, हात वारंवार धुवा असंही आवाहन मोदींनी यावेळी केलं. नववर्षाचे स्वागत करतानाच सावधही राहा, अनेक अफवा पसरतात त्याला बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका असेही मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं सांगताना मोदी म्हणाले की, अठरा लाख आयसोलेशन बेड देशभर सज्ज आहेत. पाच लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेडची तयारी करण्यात आली आहे. तर एक लाख चाळीस हजार आयसीयू बेड तयार आहेत. लहान मुलांसाठी ९० हजार बेडची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच तीन हजारांवर ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले असून राज्यांना औषधांच्या बफर स्टॉकसाठी मदत करण्यात येईल असंही मोदींनी भाषणात सांगितलं.

प्रतिबंधात्मक डोस कुणाला कधी?

पंतप्रधान मोदींनी भाषणावेळी घोषणा करताना सांगितलं की, आता पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि सहव्याधी असणाऱ्या आणि साठीपार केलेल्या ज्येष्ठांनाही प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. लहान मुलांसाठीची लसीकरण मोहीम नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरू होणार असून तर प्रतिबंधात्मक डोस १० जानेवारीपासून द्यायला सुरूवात होणार आहे. सहव्याधी असलेले पण वयाची साठीपार केलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक डोस घेता येईल.

‘डीएनए’ लसही मिळणार

देशात लवकरच नाकावाटे घेतली जाणारी आणि जगातील पहिली ‘डीएनए’ लस द्यायलाही सुरूवात होणार आहे असेही मोदींनी यावेळी जाहीर केले. लशींच्या निर्मितीसाठी देशातील वैज्ञानिकांनी अथक मेहनत घेतली असून त्यांच्या सल्ल्यानुसारच केंद्र सरकारने काम केले असून त्याचे सकारात्मक परिणाम देखील हाती येत असल्याचे मोदींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT