Netaji Subhash Chandra Bose Statue on India Gate Delhi e sakal
देश

इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, मोदींची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच येत्या २३ जानेवारीला नेताजींच्या जंयतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर ग्रॅनाइटपासून बनवलेला नेताजींचा भव्य पुतळा बसवला जाईल हे सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जोपर्यंत नेताजींचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा तिथेच राहणार असल्याचेही ते म्हणाले.

देशाच्या इतिहासात वीर जवांनांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात आली आहे. भारताच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ गेल्या 50 वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असलेली 'अमर जवान ज्योती' राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. त्यानंतर आता अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. हा वाद सुरू असतानाच आता पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले असून नेताजींचा पुतळा इंडिया गेटवर बसवल्याने देशातील तरुणांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होईल, असं सिंह म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींचा हा निर्णय म्हणजे नेताजींच्या कार्याचा सन्मान आहे, असंही सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

SCROLL FOR NEXT