modi 
देश

लेकीचा तो हट्ट बापाने केला पूर्ण, पंतप्रधान मोदींकडून कौतुकाची थाप

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई, ता. ६ : सलून व्यवसाय करणाऱ्या सी मोहन यांनी आपली मुलगी नेत्राच्या भविष्यातील उच्च शिक्षणासाठी काही रक्कम शिल्लक ठेवली होती. पण, तेरा वर्षाच्या एम. नेत्रा हिने ही रक्कम गरिबांसाठी खर्च करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे वडिलांनी पाच लाख रूपयांच्या रकमेतून गरिबांना धान्य वाटप केले. पण, ही गोष्ट इथेच थांबली नाही. या मदतीची पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात दखल घेतली आणि शाबासकीची थाप दिली. तेव्हा मात्र, या कुटुंबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 

कोरोना संसर्गामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. त्याचवेळी अनेकांचे मदतीचे हातही पुढे आले. मदुराई जिल्ह्यातील मेलामडाई गावातील सलून व्यावसायिक मोहन यांनी मुलगी नेत्रा हिच्या शिक्षणासाठी काही रक्कम शिल्लक ठेवली होती. पण, मुलीच्या वारंवार केल्या जाणाऱ्या आग्रहापुढे वडिलांचा निश्चय ढळला आणि त्यांनी अगदी कष्टातून साठवलेले पाच लाख रूपये गरिबांसाठी खर्च केले.

प्रसिद्धीविना दाखविलेल्या दातृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन मी बात’मध्ये अभिनंदनाचा वर्षाव केला आणि ही कहाणी देशाला माहित झाली. पण मोहन यांनी याचे सर्व श्रेय आपल्या मुलीला दिले आहे.  ‘मी माझे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करीन’ असे आपल्या मुलीने सांगितल्याने सर्व पाच लाख रूपये आणि बायकोच्या दागिन्यांमधून साडेतीन लाख रूपये मी गरीबांसाठी खर्च केले, अशी माहिती मोहन यांनी दिली.

लॉकडाउननंतर मोहन यांना स्वत:लाही काम मिळत नव्हते. पण, त्यांनी आपल्या परिसरातील गरजूंना मदत करायचे ठरविले. पंतप्रधानांनी अभिनंदन केल्यानंतर काही मिनिटांतच वैद्यकीय अधिकारी आणि नागरिकांनी मोहन यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांचे अभिनंदन केले. 

संयुक्त राष्ट्रांकडून दखल 
युनायटेड नेशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अॅंड पीस यांनी नेत्राला ‘गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारी’ ॲम्बेसेडर जाहीर केले आहे. तसेच तिला संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत बोलण्याची संधी दिली जाइल. दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री इ. पिलानीस्वामी यांनीही नेत्राचे अभिनंदन करून तिच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT