PM Modi Daily Routine esakal
देश

PM Modi Daily Routine : पंतप्रधान मोदींप्रमाणे अशी करा दिवसाची सुरुवात, 18 तास काम करूनही राहाल अ‍ॅक्टिव्ह

कमी वेळ झोप घेऊनसुद्धा ते देशाची धूरा अगदी व्यवस्थितपणे पार पाडताय

साक्षी राऊत

PM Modi Daily Routine : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींचे डेली रूटीन फार व्यस्त असले तरी त्यांच्या रूटीनमधला काही वेळ ते त्यांच्या आरोग्यासाठी काढतात. आणि त्यामुळे कमी वेळ झोप घेऊनसुद्धा अगदी अॅक्टिव्हपणे ते देशाचा कार्यभार सांभाळतात. सोबतच आरोग्याचीसुद्धा तेवढीच काळजी घेताय.

पीएम मोदी अशी करतात दिवसाची सुरुवात

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतात. पीएम मोदी त्यांच्या दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉक आणि मेडिटेशने करतात. शिवाय ते नियमितपणे योगाभ्यास, प्राणायम आणि सूर्यनमस्कारही करतात.

वयाची सत्तरी गाठल्यानंतरही पीएम मोदी कामकाज सुरळीत पार पाडून स्वत:चे आरोग्यसुद्धा योग्य पद्धतीने जपतात. त्यांच्याकडून इतरांनी या सवयी शिकण्याजोग्या आहेत. मोदींप्रमाणे तुम्ही तुमचा डेली रूटीन काहीप्रमाणात तुमच्या सोयीनुसार सेट केलात तर तुम्हीदेखीवल वयाच्या सत्तरीतही हेल्दी राहू शकता.

हायड्रेट राहण्यासाठी पीएम मोदी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात

हायड्रेट राहण्यासाठी पीएम मोदी फळांचे ज्यूस पितात. वर्षाचे १२ ही महिने ते कोमट पाणी पितात.

निरोगी राहण्यासाठी पीएम मोदी विशेष डाएट फॉलो करतात. मसालेदार पदार्थ खाणे ते कटाक्षाने टाळतात. त्यांच्या आहारामध्ये ताजी फळं, भाज्या, दही आणि भाज्या यांचा समावेश असतो. शिवाय त्यांना गुजराती जेवण आणि खिचडी खायला फार आवडते. (Lifestyle)

पीएम मोदी किती तास झोपतात?

पीएम मोदी २४ तासात फक्त ३-४ तास झोप घेतात. अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीत पीएम मोदींनी सांगितले होते की, ते पहाटे ५ ला उठतात. त्यानंतर व्यायाम करतात. नंतर थोड्या वेळ मॉर्निंग वॉक करतात. ९ वाजेपर्यंत त्यांचा सकाळचा नाश्ताही होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT