pm modi esakal
देश

लता दीदींचं निधन; पंतप्रधान मोदींची सभा रद्द

लतादीदींच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

लतादीदींच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढता येणार नाही.

आपल्या सुरेल आवाजाने संगीत रसिकप्रेमींच्या कानांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. देशाच्या गानकोकिळा म्हणून संगीत क्षेत्रामध्ये आलौकिक मिळवणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने आज संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Legendary Singer Lata Mangeshkar) वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान आज राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पन केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लतादिदींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून न निघणारी असल्याची पोस्ट केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, लता मंगेशकर यांच्या निधनाने झालेलं दु:ख शब्दांच्या पलिकडे आहेत. लता दिदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढता येणार नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगेशकर यांच्या आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय अशी क्षमता होती.

दरम्यान, आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनांतर देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्याच आली असून भाजपचे सर्व कार्यक्रमही आज रद्द करण्यात आले आहेत. आज सायंकाळी लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT