Modi On US Capitol 
देश

मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर सुरु असलेला वितंडवाद आज टोकाला गेलेला पहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या धुमश्चक्रीत एका आंदोलक महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शांततेचे आवाहन केले आहे. 

मोदींनी म्हटलंय की, वॉशिंग्टन डी.सी. मधील दंगा आणि हिंसाचाराबद्दलच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो आहे. शांतता आणि सुव्यवस्थेने सत्तेचे हस्तांतरण सुरूच राहिले पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रिया विकृत करु दिली जाऊ शकत नाही. 

या पार्श्वभूमीवर ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामने काही काळासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट स्थगित केलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष पदासाठी नुकतेच निवडले गेलेल्या जो बायडन यांनी म्हटलंय की मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी घेतलेल्या शपथेनुसार संविधानाचे संरक्षण करावे आणि या गोंधळाला लवकरात लवकर आवरतं घ्यावं.

गेल्या 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या मतमोजणीवर संशय घेत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तरीही या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांचाच विजय झाल्याचे चित्र होते. या निवडणुकीत झालेल्या विजयाला औपचारिकरित्या घोषित करण्यासाठी सत्र सुरु होतं.

जेंव्हा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये हे सत्र सुरु होतं तेंव्हाच ट्रम्प समर्थकांच्या हिंसक झुंडीने बॅरिकेड्सची तोडफोड करत आत प्रवेश केला. पोलिसांशी त्यांची झटापट झाली. यातील अनेक समर्थकांकडे हत्यारे होती.  ट्रम्प समर्थकांनी खिडक्या तोडल्या आणि पोलिसांशी दोन हात केले. या दरम्यानच एका आंदोलक महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहून जाण्यास सांगितले मात्र ही गोष्ट देखील अधोरेखित केली या निवडणुकीत त्यांचाच विजय झाला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

High Court Clerk Typing Test Chaos: कल्याण एपीएमसी परीक्षा केंद्रातील गोंधळामुळे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्ट कोलमडली; २५०हून अधिक विद्यार्थ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT