Pm modi vaccine 
देश

"दोन्ही लशी 'मेड इन इंडिया' याचा अभिमान; देश कोविड योद्ध्यांच्या ऋणात राहील"

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारताचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी म्हटलंय की, कोरोना विरोधातील जोशपूर्ण लढ्याला अधिक मजबूत करण्यासाठीचे हे निर्णायक वळण आहे. DCGI ने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींना मान्यता दिली आहे. यामुळे निरोगी आणि कोविड-मुक्त देशाच्या मार्गाचा वेग वाढला आहे. आमच्या साऱ्या मेहनती वैज्ञानिक आणि संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

पुढे त्यांनी म्हटलंय की, प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, ज्या दोन लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे, त्या दोन्हीही लशी भारतात तयार झाल्या आहेत. ही कृती आपल्या देशातील संशोधकांची उत्सुकता दाखवते. काळजी आणि करुणा हेच ज्या आत्मनिर्भर भारताच्या मुळाशी आहे त्या भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न यातून अधोरेखित होतात. 

प्रतिकूल परिस्थितीत कोरोना विरोधात निकराचा लढा  देणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, संशोधक, पोलिस प्रशासन, स्वच्छता कामगार तसेच सगळ्या कोविड योद्ध्यांच्या असामान्य कर्तृत्वाबाबत मी आपण कृतज्ञता व्यक्त करुयात. अनेकांचे आयुष्य वाचवल्याबद्दल आपण नेहमीच त्यांच्या ऋणात राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

या दोन लशींच्या मान्यतेसह DCGI ने झायड्स कॅडिलाची लस 'झायकोव्ह-डी' च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी दिली आहे. याबाबतची पत्रकार परिषद आज दुपारी 11 वाजता पार पडली. DCGI चे बी जी सोमानी यांनी ही घोषणा केली. 
याआधी भारतातील तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही लशींच्या वापरासाठी मंजूरी दिली होती. नव्या वर्षात 1 जानेवारी रोजी सीरमच्या कोविशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली होती तर 2 जानेवारी रोजी कोव्हॅक्सिनला तज्ज्ञांकडून ही मान्यता देण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेलं आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 100 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात. जर यावरुन लोक असंयम दाखवत असतील तर हे चुकीचं आहे, असं मत DCGI चे बी जी सोमानी यांनी व्यक्त केलं.

देशातील तीन लस निर्मिती कंपन्यांनी लशीच्या आपात्कालीन मंजुरीसाठी अर्ज केले होते. यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाद्वारे निर्माण केली जाणारी कोविशिल्ड आणि भारत बायोटेक आणि आयसीएमआर ICMR द्वारे विकसित कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. फायझर-बायोएनटेकच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. फायझरने आपला डाटा देण्यासाठी तज्ज्ञ समितीला आणखी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर फायझरच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT