PM Modi distributes about 51000 appointment letters to newly inducted recruits in govt departments under Rozgar Mela  
देश

Rozgar Mela 2023 : 51 हजार तरुणांना मिळालं नियुक्ती पत्र; PM मोदी म्हणाले, 2047 पर्यंत भारत...

रोहित कणसे

देशातील तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 51,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

नवीन नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज नियुक्तीपत्रे मिळाल्या बद्दल सर्वांचं अभिनंदन केले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचा संकल्प केला आहे. येत्या काही वर्षात आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. या काळात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची खूप मोठी भूमिका असणार आहे.

नागरिक-प्रथम या भावनेने काम करणे गरजेचे आहे. तुम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढलेल्या पिढीचा भाग आहात, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असेगी पीएम मोदी म्हणाले.

देशात 46 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्याअंतर्गत 2023 अखेरच्या शेवटापर्यंत 10 लाक तरुणांना सरकारी नौकरी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT