PM Modi Safari Look esakal
देश

PM Modi: काळी टोपी, खाकी पँट अन् प्रिंटेड टी-शर्ट; व्याघ्र प्रकल्पात जाण्यापूर्वी स्टाईलमध्ये दिसले मोदी

रुपेश नामदास

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. ते कर्नाटकला रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज, एका हातात जॅकेट घेतलेलं दिसत आहे. या शैलीत आज पीएम मोदी सफारी टूरचा आनंद घेणार आहेत.

पंतप्रधान रविवारी म्हैसूरमध्ये 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मेगा इव्हेंटमध्ये व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर करतील. ते 'अमृत काल' दरम्यान व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन देखील जाहीर करतील आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच करतील.

पंतप्रधान मोदी प्रथम चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहेत, आणि संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या आघाडीच्या क्षेत्रीय कर्मचारी आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधतील.

तामिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या चामराजनगर जिल्ह्यातील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पलाही भेट देणार आहेत. हत्तींच्या छावणीतील माहूत आणि 'कवड्यां'शी संवाद साधतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निलगिरी जिल्ह्यातील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला (MTR) भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते बोमन आणि बेली यांची ही भेट घेणार आहेत. हे तेच दांपत्य आहे त्याचा जीवन प्रवास 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटात दाखवण्यात आला.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निलगिरी जिल्ह्यात आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एमटीआर अधिकाऱ्यांनी 7 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत झोनमधील हॉटेल, हत्ती सफारी आणि पर्यटक वाहने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT