Narendra modi 
देश

मोरबी पूल दुर्घटनेबाबत बोलताना PM मोदी भावूक; म्हणाले, माझं मन...

गुजरातच्या मोरबी इथं नदीवरील झुलता पूल तुटल्यानं झालेल्या भीषण दुर्घटनेत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरातच्या मोरबी इथं नदीवरील झुलता पूल तुटल्यानं झालेल्या भीषण दुर्घटनेत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि क्षणभर बोलताना स्तब्ध झाले. यावेळी त्यांचा आवाजही कापरा झाला होता. केवडिया इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. (PM Modi gets emotional as he talks about Morbi Bridge Collapse tragedy in Gujarat Banaskantha)

मोदी म्हणाले, मी सध्या एकता नगरमध्ये आहे. पण माझं मन मोरबीतील पीडितांकडे आहे. माझ्या आयुष्यात मी अशा प्रकारचं दुःख खूप कमी वेळा अनुभवलं आहे. एकीकडे या घटनेमुळं हृदयात दुःख तर दुसरीकडं आपलं कर्तव्य अशी स्थिती आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक भावना व्यक्त करतो.

दरम्यान, गुजरात पोलिसांनी मोरबी दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये या पुलाची देखभाल करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या व्यवस्थापनातील काही लोकांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकर मंदिर सर्वांसाठी खुले! दर्शनाचे नियम आणि वेळेत झाले बदल

Uruli Kanchan Rain : उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साठण्याने वाहतुकीला अडथळा

Pune Rain : पुण्यात पावसाची शक्यता नाहीच; प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र

Katraj News : कात्रज घाट आणि वनपरिक्षेत्रात मेडिकल वेस्टेजचे ढीग;पर्यावरण व वन्यजीवांसमोर गंभीर धोका

TET Exam : ‘टीईटी’ परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT