PM Narendra Modi Sakal
देश

Man ki Baat : भारतातल्या चित्त्यांमुळे १३० कोटी भारतीय आनंदी आणि अभिमानी आहेत - पंतप्रधान मोदी

चंदीगढ विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणाही मोदींनी यावेळी केली.

सकाळ डिजिटल टीम

भारतात चित्ते परतल्याने १३० कोटी भारतीय आनंद आणि अभिमानाने भारून गेले आहेत, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मन की बात या पंतप्रधान मोदींच्या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा ९३ वा भाग आज प्रसारित झाला. त्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी चंदीगढ विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात येईल, अशी घोषणाही केली.

मन की बातच्या आजच्या भागात मोदी म्हणाले की, "देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातील लोकांनी चित्ता परत आल्यावर आनंद व्यक्त केला; १.३ कोटी भारतीय आनंदी आणि अभिमानाने भारले आहेत. एक टास्क फोर्स चित्त्यांवर लक्ष ठेवेल, ज्याच्या आधारावर आम्ही ठरवू की तुम्ही हे चित्ते केव्हा पाहू शकाल." तसंच मोदींनी चित्त्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेसाठीचं नावही सुचवण्यास सांगितलं आहे.

"गेल्या काही दिवसांत आपलं लक्ष वेधून घेतलेला विषय म्हणजे चित्ता. उत्तर प्रदेशचे अरुण कुमार गुप्ता असोत किंवा तेलंगणाचे एन. रामचंद्रन रघुराम जी, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी चित्ता भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे," असंही मोदी म्हणाले. दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, "दीनदयाळ जींनी आपल्याला आधुनिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातूनही भारतीय तत्त्वज्ञान जगाला कसे मार्गदर्शन करू शकते हे शिकवले."

"माझ्या प्रिय देशबांधवांनो, तीन दिवसांनंतर, म्हणजे २८ सप्टेंबर हा अमृत महोत्सवाचा विशेष दिवस आहे. या दिवशी आपण भारतमातेचे शूर पुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करू," शहीद भगतसिंग यांची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले. सागरी प्रदुषणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले," हवामान बदल हा सागरी परिसंस्थेसाठी एक मोठा धोका आहे आणि आपल्या समुद्रकिनाऱ्यांवर कचरा टाकणे त्रासदायक आहे, या आव्हानांना तोंड देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बनवलेल्या प्लास्टिक विरहित पिशव्या सणासुदीच्या काळात वापरा. ताग, कापूस, केळी फायबर, अशा अनेक पारंपारिक पिशव्यांचा ट्रेंड पुन्हा एकदा वाढत आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT