esakal
देश

PM Modi Interview : ''मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं होतं'' ईडी कारवायांवरुन मोदी थेटच बोलले

''तपास यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये ड्रग्ज माफिया आणि भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. ज्यांनी बेकायदेशीररित्या संपत्ती गोळा करुन मालमत्ता निर्माण केल्या, अशा लोकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत.''

संतोष कानडे

Loksabha Election 2024 : विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भाजपकडून जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकल्या जातात, या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर दिलं. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ईडी कारवायांची टक्केवारी सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ईडीने केलेल्या कारवाया ह्या त्यांच्याविरुद्धच जास्त आहेत ज्यांचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही. देशामध्ये प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. परंतु जे लोक भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत त्यांना त्यांच्या पापाची भीती ही असतेच.

मोदी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांचे किती लोक तुरुंगात आहेत? आणि हेच विरोधी पक्षनेते आहेत का? परंतु जो पाप करतो तोच भीत असतो. प्रामाणिक माणसाला कशाचीच भीती असता कमा नये. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले होते, हेसुद्धा समजून घेतले पाहिजे.

ईडीने कारवाई केलेल्या प्रकरणांमध्ये केवळ तीन टक्के प्रकरणे हे राजकारणाशी संबंधित आहेत. बाकी ९७ टक्के प्रकरणांमध्ये राजकारणाचा काहीही संबंध नाही, अशीही पुष्टी पंतप्रधानांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, तपास यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये ड्रग्ज माफिया आणि भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. ज्यांनी बेकायदेशीररित्या संपत्ती गोळा करुन मालमत्ता निर्माण केल्या, अशा लोकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीदरम्यान ईडीने केलेल्या कारवायांचं कौतुक केलं. २०१४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय एजन्सीने भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं ते म्हणाले.

''२०१४ पूर्वी ईडीने केवळ पाच हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तेव्हा ईडीला कारवाया करण्यापासून कोणी रोखले होते? याचा फायदा कोणाला मिळत होता? आमच्या कार्यकाळामध्ये ईडीने एक लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हा पैसा देशातील लोकांचा नाही का?'' असा सवाल उपस्थित करुन पंतप्रधानांनी ईडी कारवाईवर भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT