PM Modi ANI
देश

मोदींच्या रॅलीत दंगल घडवण्याचा कट उत्तर प्रदेश पोलिसांनी उधळला

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत हिंसाचार घडवण्याचा कट रचल्याचा आरोप आता समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) नेत्यांवर केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कानपूर (Kanpur) रॅलीबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कानपूर रॅलीवेळी दंगल घडवण्याचा कट रचण्यात आला होता. दरम्यान, हा कट उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी उधळून लावला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आणि उपलब्ध व्हिडिओ फूटेजमधून याबाबतचा खुलासा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत हिंसाचार घडवण्याचा कट रचल्याचा आरोप आता समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) नेत्यांवर केला जात आहे. याप्रकरणी एकाला अटकही झाल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या आधी कानपूरच्या नौबस्तामध्ये समाजवादी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला अटक कऱण्यात आली. त्याने आपल्याच गाडीवर पंतप्रधान मोदींचे पोस्टर लावून तोडफोड केली आणि आग लावली. एवढंच नाही तर तोडफोड आणि आग लावल्याचा व्हिडिओ रॅलीच्या आधीचा व्हिडिओ व्हायरलसुद्धा केला. व्हिडिओच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांना भडकावण्याचा कट होता. रॅलीत आलेल्या लोकांना भडकावून हिंसा घडवायची असा प्लॅन होता पण पोलिसांच्या सावधानतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

पोलिसांनी नौबस्ता पोलिस ठाण्यात कानपूरच्या काही समाजवादी पक्षाच्या नेत्यांविरोधात भादंविच्या वेगवेगळ्या कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या कानपूर दौऱ्यात हिंसाचार करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, नौबस्ता ठाण्याच्या हद्दीत एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या सदस्यांनी आंदोलनाच्या नावावर अनुचित प्रकार केला आहे. तसंच काही वाहने फोडली असून मारहाणही केली. राजकीय आंदोलनाच्या नावावर कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. अशा समाजकंटकांची ओळख पटवून त्यांना अटक कऱण्यात येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कायम राखण्याचं आवाहन आय़ुक्तांनी केलं आहे.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कानपूर दौऱ्यावर होते. त्यांनी कानपूरमध्ये मेट्रोचं उद्घाटन केलं आणि अनेक योजनांचे लोकार्पण केलं. कानपूरमध्ये रॅलीआधी मोदींनी मेट्रोने प्रवाससुद्धा केला. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT