pm modi  
देश

पंतप्रधान मोदींकडून स्टार्टअपला मोठं गिफ्ट; 1 हजार कोटींच्या फंडाची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या स्टार्टअप फंडाची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, स्टार्टअपच्या माध्यमातून देशात ई टॉयलेट ते पीपीई कीट आणि दिव्यांगांसाठी सेवा देण्याच्या क्षेत्रात काम केले जात आहे. यामध्ये भविष्य बदलण्याची ताकद आहे. येत्या काही दिवसात स्टार्टअपसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी गॅरंटी देण्यासाठीही पावले उचलली जातील.

मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून Startup India International Summit: Prarambh कार्यक्रमात मार्गदर्शन केले. मोदींनी एक टीव्ही शो स्टार्टअप चॅम्पियन्स कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी मोदींनी भारतात चेन्नई, भोपाळ, गाझियाबाद, सोनीपतसह इतर अनेक ठिकाणच्या स्टार्टअप कामांबद्दल माहिती घेतली. 

देशात सध्या 41 हजारांहून अधिक स्टार्टअप मोहिमेत सामिल असून यातील 5 हजार 700 हून अधिक आयटीमध्ये तर 1700 पेक्षा जास्त कृषी क्षेत्रात आहेत. गेल्या पाच वर्षात ही परिस्थिती असून 2014 च्या आधी देशात फक्त चार स्टार्टअप यूनिकॉर्न क्लबमध्ये होते. आज ही संख्या 30 पेक्षा जास्त झाली आहे असंही मोदी म्हणाले.

मोदींनी 1 हजार कोटींचा स्टार्टअप फंड लाँच करताना म्हटलं की आम्ही स्टार्ट अप सिस्टिम तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही व्यवस्था of the youth, by the youth, for the youth या मंत्रावर आहे.

मोदी म्हणाले की, स्टार्टअपच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सुरु असलेली घोडदौड पाहता यात भविष्य बदलण्याची ताकद असल्याचं म्हणता येईल. देशातील स्टार्टअप कंपन्यांनी कोरोना व्हायरसच्या काळात संधी शोधल्या. स्टार्टअपने परंपरागत वाट सोडून नवा मार्ग धरला असून त्यात आता विविधता दिसत असल्याचंही मोदींनी सांगितलं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT