PM Narendra Modi टिम ई सकाळ
देश

मोदींनी संसदेला प्रचाराचा आखाडा बनवला; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक बोलणे म्हणजे...

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सभागृहात विविध मुद्दे उपस्थित करून आज काँग्रेसला (Congress)धारेवर धरले. तसेच महाराष्ट्र काँग्रेसने रेल्वेतून लोकांना युपी-बिहारला पाठवून तिकडे कोरोना पसरवला असा गंभीर आरोप केला. यावर काँग्रेसने तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांनी सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. संकटात मदत करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. तुमच्यासारख संकटात देशाला आम्ही सोडणार नाही. काँग्रेसचा 'हात' नेहमीच त्यांच्या पाठीशी असेल असे काँग्रेसने ठणकावून पंतप्रधान आणि भाजपला सांगितले. यावर राष्टवादीने ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंजाब, युपी, उत्तराखंडच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संसदेला प्रचाराचा आखाडा बनवले असा निशाणा राष्ट्रवादी (NCP) पार्टीने सोशल मीडियावर पोस्ट करत लगावला आहे.

राष्टवादी पार्टीने पोस्टमध्ये म्हटले की,

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला 'चुनावजीवी' स्वभाव काही सोडलेला नाही. कोरोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये कोरोना वाढला, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे सध्या बिगूल वाजलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य योगायोग नक्कीच नाही.

NCP

वास्तवात एका रात्रीत घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांतून परप्रांतीय श्रमिक आपापल्या गावाला मिळेल त्या साधनाने, प्रसंगी रस्त्याने चालतही गेले. मग पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फक्त याच राज्यांचा उल्लेख का केला? असा प्रश्न उपस्थित केला.

लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने श्रमिक ट्रेन चालविल्या होत्या. सर्वाधिक ट्रेन या गुजरात राज्यातून सुटलेल्या आहेत. तर उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ट्रेन गेल्या होत्या. ही माहिती केंद्र सरकारच्यावतीने १६ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत दिली गेली होती. मात्र पंजाब राज्यात श्रमिक ट्रेन गेल्या नव्हत्या. पंजाब राज्यातून खूप कमी लोक बाहेरच्या राज्यात कामगार म्हणून जातात. उलट उत्तरेतील अनेक राज्यातील कामगार हे पंजाबमध्ये शेतीच्या कामावर जात असतात. असे असतानाही पंजाबमध्ये कोरोना वाढवण्यामागे महाराष्ट्राचा बादरायण संबंध जोडण्यामागचा पंतप्रधानांचा हेतू स्पष्ट आहे. फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही. अशी खंत ही राष्टवादीने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

Trump Tariffs: अमेरिकेच्या 'टॅरिफ'वर मोहन भागवत पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, आम्ही असो वा नसो...

India textile export plan: ट्रम्प यांना भारतचं सडेतोड प्रत्युत्तर! आता अमेरिका वगळता ‘या’ ४० देशांशी करणार संपर्क

Bribe Case : तीस हजार रुपये लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास पकडले; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT