फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस 
देश

'भविष्यात सत्तेत राहायचं नाही, कारण...'; मोदींनी केली 'मन की बात'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मी आता पण सत्तेत नाही आणि भविष्यात देखील सत्तेत राहायचं नाही. मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. मला पंतप्रधान पद हे सत्ता म्हणून महत्वाचं वाटत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. आज ते 'मन की बात' (PM Modi Man ki Baat) बोलत होते.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राजेश कुमार प्रजापती या व्यक्तीवर उपचार झाले. त्याबाबत त्याने मोदींचे आभार मानले. तसेच त्यांना सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मोदी म्हणाले, ''मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यात पण सत्तेत राहायची इच्छा नाही. कारण मला जनतेच्या सेवेत राहायचं आहे. आता देखील मी जनतेच्या सेवेत आहे. पंतप्रधान पद हे सत्ता म्हणून माझ्यासाठी महत्वाचं नाही. मी जनतेचा सेवक आहे.'' तसेच यावेळी त्यांनी आयुष्मान भारत योजनेचं महत्व सांगितलं. प्रत्येकाने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड बनवायला पाहिजे. पैशामुळे उपचार मिळत नाहीत, असं व्हायला नको. कुटुंबातील सर्वांना कार्ड बनवायला सांगा. त्यामुळे खासगी रुग्णालयात देखील उपचार घेता येतील, असं मोदी म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त देशात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम सुरू असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमांबाबत मला अनेक प्रतिक्रिया येत आहेत, असंही मोदींनी सांगितलं. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जनजातीय गौरव सप्ताह साजरा करण्यात आला. त्याचा उल्लेख देखील त्यांनी 'मन की बात'मध्ये केला. तसेच कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे जनतेनी काळजी घ्यावी असंही आवाहनही त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT