देश

मी आणि आईने लसीचे दोन्ही डोस घेतले; तुम्हीही घ्या - PM मोदी

नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी देशात 24 तासांत झालेल्या रेकॉर्डब्रेक लसीकरणावर चर्चा झाली. मध्य प्रदेशमधील बैतूल येथील राहणाऱ्या ग्रामिण भागाताली एका व्यक्तीला गावातील लसीकरणाबाबत मोदींनी विचारपूस केली. गावातील लोकांचं लसीकरण न करण्याचं कारण ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का बसला. यावेळी मोदी त्या व्यक्तीला म्हणाले की, 'मी आणि माझ्या आईने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तुम्हीपण लस घ्या. जर कोणी लस घेण्यास नकार देत असेल, किंवा अफवा पसरवत असेल तर त्यांना समजवा. लसीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना महामारीवर विजय मिळवायचा असल्यास लस घेणं गरजेचं आहे.'

कोरोनापासून बचाव करण्याचे फक्त दोन मार्ग आहेत. एक लसीकरण आणि दुसरा.. मास्क वापरा अन् कोरोना नियमांचं पालन करा. ग्रामिण भागातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं की, जेव्हा लसीकरणाचा नंबर येईल तेव्हा लस घ्या. मोदी यांनी गावात विलगीकरण कक्ष आणि इतर नियम तयार करण्याबाबतही आवाहन केल. जोपर्यंत प्रत्येकाचं लसीकरण होत नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं मोदी म्हणाले.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान देशवासीयांसोबत मन की बात या कार्यक्रमांद्वारे संवाद साधत असतात. आजच्या (27 जून 2021) मन की बात कार्यक्रमाची सुरुवात मोदी यांनी वेगळ्या पद्धतीने केली. ते म्हणाले की, प्रत्येत मन की बात कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार असतो. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. देशवासीयांना उद्देशून ऑलिम्पिकशी संबंधित काही प्रश्न विचारले, तसेच भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो! नेहमीच ‘मन की बात’ मध्ये, आपल्या प्रश्नांचा वर्षाव होत असतो. ह्या वेळी मला वाटले, काहीतरी वेगळे करावे, मी आपल्याला प्रश्न विचारावे. तर माझे प्रश्न काळजीपूर्वक ऐका! ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकले आहेत? ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? मित्रांनो, उत्तरे मला पाठवू नका, परंतु My Gov मध्ये जर आपण ऑलिंपिकवरील प्रश्नोत्तरी मधील प्रश्नांची उत्तरे दिली तर आपण बक्षीसे जिंकू शकाल. My Gov च्या ‘रोड टू टोकियो’ या प्रश्नमंजुषेत असे अनेक प्रश्न आहेत. आपण ‘रोड टू टोकियो’ प्रश्नमंजुषेत भाग घ्या. भारताने यापूर्वी कशी कामगिरी केली आहे? आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे? हे स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT