PM Modi Pune Visit esakal
देश

PM Modi Pune Visit : टिळक पगडी, उपरणे अन्.. पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कारासोबत देण्यात आल्या या गोष्टी

टिळकांनी पाहिलेल्या आत्मनिर्भर भारताने स्वप्न मोदींच्या लोककल्याणकारी कामकाजातून पूर्ण होत असल्याचे आम्हाला दिसून आले असे टिळकांचे पणतू दीपक टिळक म्हणाले.

साक्षी राऊत

PM Modi Pune Visit : पीएम मोदी यांना नुकताच पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कर मोदींना देण्यामागचं मुख्य कारण असं की, लोकमान्य टिळकांनी जे स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानाचे स्वप्न पाहिले होते ते सूत्र नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी कामकाजातून दीपक टिळकांना दिसले. त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. असे लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाच्या लोकमान्य टिळक पुरस्काराचे मानकरी पीएम मोदी ठरले.

पीएम मोदींना पुरस्कारासह या खास गोष्टी प्रदान करण्यात आल्याॉ

पीएम मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासह शाल श्रीफळ, लोकमान्य टिळक वापरायचे अगदी तसंच एक उपरणं आणि भगवद्गीता गीता व लोकमान्य टिळकांची मूर्ती, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक असणारं खास सन्मानचिन्ह आणि रोख १ लाख रुपये पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात आली. (PM Modi Pune Visit)

पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात मिळालेली १ लाखांची रक्कम नमामी गंगे योजनेसाठी देणार असल्याची घोषणा केलीय. पीएम मोदींचे याआधीही पुण्यात दोन दौरे होऊन गेलेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आणि पुण्यातील अन्य महत्वाच्या कामांचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने हा पीएम मोदींचा तीसरा पुणे दौरा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या सत्तांतराची Inside Story

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

SCROLL FOR NEXT