PM Kisan 13th Installment Sakal
देश

PM Kisan : होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट; जाहीर केला किसान योजनेचा 13वा हप्ता

पीएम किसानचा 12 वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये जारी करण्यात आला होता. तर, 11 वा हप्ता मे 2022 मध्ये देण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

PM Kisan 13th Installment : होळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील बेलगावी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता जारी केला आहे. पीएम किसानचा 12 वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये जारी करण्यात आला होता. तर, 11 वा हप्ता मे 2022 मध्ये देण्यात आला होता.

मोदींनी बटण दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये हस्तांतरित केले. यामुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,800 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. 

पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आज पीएम किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता पाठवण्यात आला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात पैसा गायब होत होता. मात्र, आम्ही होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे.

जारी करण्यात आलेला हा हप्ता केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्यांची नावे योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या यादीत आहे. काही कारणास्तव एखाद्या शेतख्याचे नाव यादीत समाविष्ट नसेल तर, असे शेतकरी पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर फोन करून मदत घेऊ शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

Domestic Gas Cylinder Misused by Hotels : हॉटेलमध्ये घरगुती गॅस; भरारी पथक सुस्त

बोर्डाचा मोठा निर्णय! कॉपी रोखण्यासाठी आता ग्रामीणऐवजी शहरांमध्येच सर्वाधिक परीक्षा केंद्रे; बोर्डाची पथके तपासणार प्रत्येक केंद्रांवरील सुविधा, वाचा...

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

SCROLL FOR NEXT