PM Modi Monsoon Review Meeting E sakal
देश

PM मोदींची महत्वाची बैठक, उष्णतेची लाट-मान्सूनबद्दल घेणार आढावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. तसेच मान्सून देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi Meeting) अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. नुकतेच युरोप दौऱ्यावरून परतलेले मोदी दिवसभरात सात ते आठ सभा घेणार आहेत. याबाबत पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

एप्रिलमध्ये देशातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४६-४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली होती. राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील विदर्भ या पाच भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दिल्लीत 1951 नंतर या वर्षीचा दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिन्याची नोंद झाली. या काळात 40.2 अंश सेल्सिअस मासिक सरासरी कमाल तापमान नोंदवण्यात आले. 1941 मध्ये दिल्लीत एप्रिल महिन्याचे उच्च कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते.

महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा ४६ अंशाच्या पार पोहोचला होता. अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. पण, दोन दिवसांपूर्वी रिमझिम पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. तसेच दिल्लीत देखील एक दिवसापूर्वी काही भागात गारपीटीसह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

यापूर्वी व्यक्त केली होती चिंता -

गेल्या आठवड्यात, मोदींनी वाढत्या तापमानाबद्दल आणि लँडफिल्स, कचऱ्याचे ढिगारे आणि जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांबद्दल तीव्र इशारा दिला होता. देशातील तापमान झपाट्याने वाढत असून विविध ठिकाणी आगीच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मुख्यमंत्र्यांशी बोलताना मोदींनी राज्यांना रुग्णालये, कारखाने आणि सार्वजनिक महत्त्वाच्या इतर इमारतींच्या अग्निसुरक्षा ऑडिटला प्राधान्य देण्यास सांगितले होते. आता मोदी राज्यातील उष्णतेची लाट आणि मान्सूनच्या तयारीची आढावा बैठक घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

CCTV Rules 2026 : काय भारतात लाखो CCTV कॅमेरे सुरक्षित आहेत? Qubo CEO नी दिला हॅकिंगचा इशारा, तुमचा कॅमेरा सेफ आहे का? 'असे' करा चेक

Satara Politics : भाजपची 'अफाट' किमया! संख्याबळ कमी असतानाही साताऱ्यात सत्ता कशी मिळवली? वाचा सविस्तर इनसाईड स्टोरी

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

SCROLL FOR NEXT