PM Modi Russia Tour Esakal
देश

PM Modi Russia Tour: असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा, एका क्लिकवर वाचा संपूर्ण शेड्युल

PM Modi Russia Tour Schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ८ जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ८ जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात भारत आणि रशिया यांच्यातील 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी मोदी मॉस्कोमध्ये असतील.

वार्षिक शिखर परिषदेमुळे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना संरक्षण, व्यापार संबंध, गुंतवणूक संबंध, ऊर्जा सहकार्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील देवाणघेवाण यासह द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेता येणार आहे. ते परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर आपला दृष्टीकोन स्पष्ट करणार आहेत.

8 जुलै

सकाळी 10:55 वा. पंतप्रधान मोदी मॉस्कोला रवाना झाले. .

सायंकाळी 5:20 वा. पंतप्रधान मोदींचे विमान Vnukovo-II आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल.

रात्री 9:30 ते 11:30 पर्यंत: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत खाजगी बैठक आणि डिनर आयोजित केले जाईल.

9 जुलै

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. आणि त्यानंतर ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना होणार.

अध्यक्ष पुतिन यांच्याकडून डिनर

रशियाचे अध्यक्ष पुतिन आज पंतप्रधानांसाठी खाजगी डिनरचे आयोजन करणार आहेत. उद्या, पंतप्रधान मोदी रशियातील भारतीयांशी संवाद साधणार आहे. यानंतर रशियाच्या अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान क्रेमलिनमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमधील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

ऑस्ट्रिया दौरा

दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी 9 ते 10 जुलै या कालावधीत ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असेल. ते ऑस्ट्रियाच्या चांसलरशी मर्यादित शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा करणार आहेत.

ऑस्ट्रिया हा एक महत्त्वाचा मध्य युरोपीय देश आहे आणि पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान क्षेत्र, स्टार्ट-अप क्षेत्रे, मीडिया आणि मनोरंजन या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Latest Marathi News Update : सासवडमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

निवेदिता सराफच्या आईला पाहिलत का? अभिनेत्री दिसते सेम आईसारखी, Photo Viral

Akola: पीक नुकसानभरपाईसाठी ४० लाख मंजूर; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT