PM Modi Says Rahul Gandhi 
देश

पंतप्रधान मोदी राहुल गांधींना म्हणाले 'मूर्खों का सरदार'; बोचऱ्या टीकेचं कारण काय?

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून प्रचारसभांचा धडाका लावण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून प्रचारसभांचा धडाका लावण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी हे स्टार प्रचारक आहेत. दोन्ही नेते प्रचारसभेदरम्यान एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बैतूलच्या प्रचारसभेमध्ये बोलताना राहुल यांचा उल्लेख 'मूर्खो का सरदार' असा केला आहे.

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील एका सभेत बोलताना म्हटलं होतं की आपण 'मेड इन चाइना' वस्तू मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. पण, आता आपल्याला 'मेड इन मध्य प्रदेश' वस्तू निर्माण करायच्या आहे. राहुल यांच्या या वक्तव्याचा मोदी यांनी समाचार घेतला. (PM Modi Says Rahul Gandhi Sardar of Fool What is the reason for the criticism mp election 2023)

मी ऐकलंय की एक महाशय म्हणत होते की भारतातील सर्व लोकांकडे चायना मेड मोबाईल आहे. एका महाज्ञानीला वाटतं की सर्वांकडे चाईना मोबाईल आहे. अरे मूर्खो के सरदार, कोणत्या जगात राहतात हे लोक. आपल्या देशाची उपलब्धी न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेसला झाला आहे. यांनी विदेशातील कोणते चष्मे घातलेत माहिती नाही. त्यांना आपल्या देशाचा विकास दिसतच नाही, असं म्हणत मोदींनी निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील मोबाईल उत्पादनाची माहिती सभेतील लोकांना दिली. सत्य हे आहे की भारत मोबाईलची निर्मिती करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. काँग्रेसच्या काळात देशात २० हजार कोटी रुपयांचे मोबाईल बनत होते. पण, आज भारतात साडे तीन लाख कोटींचे मोबाईल बनत आहेत. जवळपास १ लाख कोटी किंमतीचे मोबाईल दुसऱ्या देशांना निर्यात केले जात आहेत. आज देशात मोठ्या प्रमाणात लोक स्वदेशी वस्तू खरेदी करत आहेत, असं ते म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांनी हरदा येथील सभेत 'मेड इन चायना'चे 'मेड इन मध्य प्रदेश' करण्याचं वक्तव्य केलं होतं. आज अनेक वस्तू मेड इन चायना असल्याचं दिसतं. पण, वस्तूंवर मेड इन मध्य प्रदेश लिहिलेलं आपल्याला करायचं आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हेच काम करणार आहोत. राज्यात बेरोजगारी राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करु, असं ते म्हणाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT