PM Narendra Modi  esakal
देश

काशी विश्वनाथाच्या सेवेकऱ्यांना PM मोदींकडून खास भेट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काशी विश्वनाथधाम येथे काम करणाऱ्या सेवेकऱ्यांना ज्यूटपासून तयार करण्यात आलेल्या पादत्राणांच्या शंभर जोड्या भेट म्हणून पाठविल्या आहेत. (Kashi Vishwanath Dham) येथील सेवेकऱ्यांना चामडे आणि रबरापासून तयार करण्यात आलेली पादत्राणे वापरता येत नाहीत त्यामुळे त्यांना हिवाळ्यामध्येही सर्वत्र अनवाणीच वावरावे लागते, याचा त्यांना खूप त्रास होतो.

पंतप्रधान मोदींनी दिलेली भेट

या मंदिरातील पुजारी, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कामगार आणि अन्यजणांना नव्या पादत्रणांचा लाभ होणार आहे. काश्वी विश्वनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासावर पंतप्रधान मोदींचे बारीक लक्ष असून ते येथील कामांचा वेळोवेळी आढावा घेत असल्याचे दिसून आले आहे. देवस्थानाच्या कारभाराप्रमाणेच मंदिरातील दैनंदिन विधी आणि किरकोळ समस्यांकडेही मोदींचे बारीक लक्ष असते. मागील महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विश्वनाथधामच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी मोदींनी येथील सेवेकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या या भेटीवर सेवेकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून हिवाळ्यातील समस्यांपासून आमची सुटका झाली असल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT