PM Kisan Samman Nidhi Installment
PM Kisan Samman Nidhi Installment Esakal
देश

PM Kisan Samman Nidhi Installment : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM मोदी यवतमाळमधून आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 6 हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीतील सोळावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी (ता. २८ फेब्रुवारी) यवतमाळ येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे.

पीएम किसान योजनेचे २ हजार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे ४ हजार, असे एकूण ६ हजार रुपये आज बुधवारी राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यानिमित्ताने केंद्र शासनाने उद्या संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशीमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे. या समारंभास प्रत्यक्ष वा https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सतराशे बसगाड्या यवतमाळ जिल्ह्यात

पंतप्रधान मोदी आज बुधवारी (ता.२८) महिला बचत गटांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून अडीच लाख महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी राज्यातून सतराशे बसगाड्या बोलविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, नांदेड, नगर आदी अनेक आगारांतील बसगाड्या दाखल झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT