देश

Global Leaders List:ग्लोबल लीडर्सच्या यादीत मोदींचा नंबर पहिला, बायडन-पुतिनलाही टाकलं मागे

ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या अहवालानुसार, पीएम मोदींना ७६ टक्के भारतीयांचा पाठिंबा आहे तर केवळ १८ टक्के भारतीय त्यांच्या विरोधात आहेत.

Manoj Bhalerao

PM Modi Global Leader:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातील प्रमुख नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या अहवालानुसार, पीएम मोदींना ७६ टक्के भारतीयांचा पाठिंबा आहे तर केवळ १८ टक्के भारतीय त्यांच्या विरोधात आहेत.

मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील एकूण 22 देशांच्या सरकार प्रमुखांच्या लोकप्रियतेचे मूल्यांकन केले आहे. त्यात भारताशिवाय अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांच्या नेत्यांचा समावेश आहे.

मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या अहवालात, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शीर्षस्थानी आहेत तर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सेओर युल शेवटच्या स्थानावर आहेत. या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो दहाव्या क्रमांकावर आहेत.

सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या 5 यादीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर स्विस राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट 64% टक्के अप्रूवल रेटिंगसह दुसर्‍या स्थानावर आहेत, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 61% अप्रूवल रेटिंगसह तिसर्‍या स्थानावर आहेत, ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा आहेत. 49% अप्रूवल रेटिंगसह चौथ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज 48% अप्रूवल रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

ऑस्ट्रेलियात प्रवीण तरडेंची हरवलेली पैशांची बॅग ! सई ताम्हणकरने केलेली अशी मदत "आपली इंडस्ट्री मदत.."

आफ्रिकेच्या सुपीक जमिनीत भारतीयांची कमाल; जगाचे अन्न संकट मिटवणारी 'महासंधी'

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

SCROLL FOR NEXT