PM Modi Foreign Visit sakal
देश

PM मोदी ३ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर, यंदाची पहिली विदेशवारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी (PM Modi) २ ते ४ मे दरम्यान विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यंदा त्यांची ही पहिली विदेशवारी (PM Modi Foreign Tour) असून ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून (MEA) माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी बर्लिनमध्ये जर्मनीचे फेडरल चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही नेते भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलतीच्या दृष्टीने चर्चा करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगनला जाणार आहेत. डेन्मार्कने आयोजित केलेल्या दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतही ते सहभागी होतील. 4 मे रोजी ते परतीच्या प्रवासात पॅरिसमध्ये थांबतील आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भेटतील. यंदा भारत आणि फ्रान्स यांच्यामधील संबंधाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट घेऊन दोन्ही देशातील संबंध आणखी मैत्रीपूर्ण करण्यासंबंधी चर्चा करतील, असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट असल्याने पंतप्रधान मोदींचे विदेश दौरे देखील रद्द झाले होते. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने मोदी इटली आणि ब्रिटनच्या पाच दिवशीय दौऱ्यावर गेले होते. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान त्यांनी इटलीला भेट दिली होती. त्यानंतर मोदी १ ते २ नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो येथे हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या आयोजित बैठकीत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

रणवीर-दीपिका अबू धाबीचे ब्रँड कपल अ‍ॅम्बेसेडर! पहिलं बॉलीवूड पॉवर कपल ठरलं ब्रँडचं चेहरा

SCROLL FOR NEXT