PM Modi at Dhanushkodi eSakal
देश

PM Modi at Dhanushkodi : पंतप्रधान मोदींनी दिली 'रामसेतु'ला भेट; धनुषकोडि येथील मंदिरात केली पूजा.. व्हिडिओ समोर

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काही तास उरले आहेत. यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत.

Sudesh

PM Modi Visits Dhanushkodi : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काही तास उरले आहेत. यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज 'रामसेतु' ज्याठिकाणी आहे, त्या ठिकाणाला भेट दिली. यानंतर त्यांनी धनुषकोडि येथील कोंदडारामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.

आज सकाळी दहाच्या सुमारास पंतप्रधान मोदी धनुषकोडि येथील अरिचल मुनाई येथे पोहोचले. याच ठिकाणापासून रामसेतू उभारण्यात आला होता, असं म्हटलं जातं. तर, धनुषकोडि येथे बिभीषण पहिल्यांदा श्रीरामाला भेटले होते, आणि त्यांना शरण आले होते. काही आख्यायिकांनुसार, याच ठिकाणी श्रीरामांनी बिभीषणाचा राज्याभिषेक केला होता.

याठिकाणी श्री कोदंडाराम स्वामींचं मंदीर आहे. कोदंडारामा शब्दाचा अर्थ धनुष्यधारी राम असा होतो. पंतप्रधान मोदींनी आज या मंदिरात दर्शन घेतलं, तसंच याठिकाणी त्यांनी विधिवत पूजादेखील केली.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी रामायण काळाशी संबंधित मंदिरांना भेट देत आहेत. शनिवारी त्यांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम येथे असणाऱ्या रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिली होती.

उद्या होणार महा सोहळा

धनुषकोडि येथील भेटीनंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत. सोमवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान ते अयोध्येला पोहोचतील. त्यानंतर 11 वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत हा सोहळा सुरू असेल. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन, यूट्यूब आणि पीव्हीआर सिनेमांमध्ये देखील पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT